Rajendra Patil esakal
जळगाव

Jalgaon News : कर्जबाजारी शेतकऱ्याने चोरवड येथे उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : ‘अवकाळी’मुळे शेतीच्या उत्पन्नात घट, त्यात कर्ज कसे फेडायचा, अशा विवंचनेत असलेल्या चोरवड (ता. पारोळा) येथील शेतकऱ्याने मंगळवारी (ता. १७) विष प्राशन करून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : ‘अवकाळी’मुळे शेतीच्या उत्पन्नात घट, त्यात कर्ज कसे फेडायचा, अशा विवंचनेत असलेल्या चोरवड (ता. पारोळा) येथील शेतकऱ्याने मंगळवारी (ता. १७) विष प्राशन करून आत्महत्या केली. राजेंद्र गजमल पाटील (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर साधारणत: लाखाचे कर्ज होते. (Jalgaon debt ridden farmer took an extreme step in Chorwad)

राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी (ता. १७) सकाळी दहाला आपल्या राहत्या घरी काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याचे त्यांची सून आरती पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच दूरध्वनीवरून त्याचे पती राहुल पाटील यांना कळविले. तेव्हा राहुल पाटील यांनी तातडीने त्यांना उपचारार्थ पारोळा येथील कुटीर रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत राजेंद्र पाटील यांचा मुलगा पाटील यांनी पारोळा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पाटील यांच्यावर चोरवड विविध कार्यकारी सोसायटीचे सुमारे ६० हजार व हात उसनवारीचे ५० ते ६० हजार रुपये कर्ज आहे.

ते कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. त्यातच यावर्षी बेमोसमी पावसाने उत्पनात घट आल्याने नैराश्येपोटी काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, चार मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी (ता. १८) सकाळी साडेनऊला चोरवड येथील खोल महादेव चौकातून निघणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT