death esakal
जळगाव

Jalgaon News : झोक्याचा स्टंट बेतला जिवावर; गळ्यात दोर आवळून तरुणीचा करुण अंत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाबळ परिसरात घरातील झोक्याची दोरी गळ्यात आवळल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. झोक्यावर स्टंटबाजी करताना ही दुर्घटना घडली. विधी पाटील (वय १८), असे मृत तरुणीचे नाव आहे.


महाबळ कॉलनीत पोलिस चौकीमागील गल्लीत विधी पाटील आई तेजस्विनी, वडील स्वप्नील पाटील, आजोबासह वास्तव्याला होती. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील संगणक क्लास चालवतात. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी घरात कोणीही नसताना विधी दुसऱ्या मजल्यावरील नायलॉन दोरीच्या झोक्यावर बसली होती.

झोका घेत असताना, अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास आवळला जाऊन तिचा जीव गुदमरला. त्यावेळी घरात कुणीही नसल्याने दोरीचा गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या आजोबांनी तिच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र, कॉल उचलत नसल्याने ते घरी आले. वरच्या मजल्यावर विधीला झोक्याचा गळफास लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. विधीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विधी एकुलती एक मुलगी असल्याने कुटुंबीयांवर संकट ओढवले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक प्रशांत पाठक, ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहेत.

स्टंटबाजी बेतली जिवावर
विधी निवांत असताना, याच झोक्यावर खेळत असे. घरात सर्वांदेखत झोक्याचे स्टंट ती करत होती. झोक्याशेजारीच असलेल्या कॉटवरून जम्प (उडी घेत) करून ती अलगद झोक्यावर बसायची अन्‌ झोक्यातून चालता-चालता उतरायची. घरात कोणीही नसताना विधी वरच्या मजल्यावर एकटीच झोक्यावर होती.

तिने नेहमीच्या सवईप्रमाणे कॉटवरून उडी घेत झोक्यावर बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा अंदाज चुकून ती सटकली अन्‌ नेमके त्याच वेळेस झोक्याची दोरी तिच्या गळ्याभवती अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज घटनास्थळी पंचनामा करणाऱ्या पोलिसांसह कुटुंबियांनी वर्तविला.


अन्‌ अजोबा घरात आले...

विधीचे आजोबांनी बाहेरून फोन केला. मात्र, ती फोनच घेत नसल्याने त्यांनी घरची वाट धरली. घरात शिरल्यावर आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने ते वरच्या मजल्यावर गेले. तेथे त्यांना झोक्यात अडकलेल्या अवस्थेत विधी दिसताच त्यांनी डाहो फोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT