Cyber Crime  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : पॉलिसीवर बोनस मिळाल्याचा बनाव; 14 वर्षांत 23 लाख 47 हजारांचा गंडा

Jalgaon Fraud Crime : खोटा चेक व्हॉट्‌सॲपवर टाकून त्याद्वारे विश्वास संपादन करत तब्बल २३ लाख ४७ हजार रुपयांचा गंडा रावेर तालुक्यातील शेतकऱ्याला घालण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : तुमच्या पॉलिसीवर बोनस मिळाला आहे, असे खोटे सांगून बोनस आणि अतिरिक्त लाभ मिळाल्याचा खोटा चेक व्हॉट्‌सॲपवर टाकून त्याद्वारे विश्वास संपादन करत तब्बल २३ लाख ४७ हजार रुपयांचा गंडा रावेर तालुक्यातील शेतकऱ्याला घालण्यात आला. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (jalgaon sending fake check on WhatsApp farmer was defrauded to tune of Rs 23 lakh 47 thousand)

ऐनपूर (ता. रावेर) येथील शेतकरी संजय त्र्यंबक कुलकर्णी (वय ७१) यांना २०१० मध्ये अज्ञात व्यक्तीने फोनवरून संपर्क करुन तुमच्या पॉलिसीवर बोनस जाहीर झाला आहे, असे सांगून खोटा चेक व्हॉट्‌सॲपद्वारे पाठविला.

तुमची गुंतवणुक केलेली रक्कम वाढली असून, ती तुम्ही इतर पॉलिसीत गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला. संशयितांनी संजय कुलकर्णी यांच्याकडून वेळोवेळी २३ लाख ४७ हजार ८७ रुपये बँक खात्यांद्वारे स्वीकारले.

संशयितांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही आपल्याला पॉलिसीचा नफा किती झालाय, हे बघण्यासाठी गेले असता, असा कुठलाच नफा झाला नसून जमा केलेले पैसेही लुटण्यात आल्याचे निदर्शनास आले.

याबाबत संजय कुळकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi on Rahul Gandhi : 'विरोधी पक्षात असे काही नेते आहेत, जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात, परंतु...’’

Pune University Flyover : गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू; वाहनचालकांना कोंडीपासून काहीसा दिलासा

Mumbai News : रोषणाईपासून बससेवेपर्यंत… गणेशोत्सवासाठी बेस्टची फुल तयारी

Crime News : नागा साधूच्या वेशात फसवणूक; नाशिकमध्ये संमोहन करून अंगठी व रोकड लंपास

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

SCROLL FOR NEXT