Faizpur (T.Yawal): Nitin Mahajan, a disabled person, directly stormed the second floor of the municipality to demand the solution to the water problem. esakal
जळगाव

Jalgaon Water News : अहो..पाणी मिळेल का पाणी!; पालिकेवर धडक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील विविध भागांत उदभवलेली पाणी समस्या सुटता सुटत नाही. आज एका दिव्यांग नागरिकाने पालिकेच्या चक्क वीस पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाणीपुरवठा विभागात धडक देऊन चार वर्षांपासून होणारी पाणी समस्या कायमची मार्गी लावण्याची मागणी केली. त्याच्यासोबत यावेळी वस्तीत राहणारे नागरिक होते.

शहरात दररोज विविध भागांत पाण्याची ओरड सुरू आहे. दररोज पालिकेत येणाऱ्या पाण्याच्या समस्यांचे निराकरण होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या भागातून पाण्याची ओरड आली, त्या भागात फक्त खड्डे खोदून जलवाहिनी तपासण्याचे अयशस्वी प्रयत्न सुरू आहेत.(Jalgaon Water supply issue request of a disabled citizens in Faizpur Hit municipality Jalgaon News)

कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने व योग्य नियोजनाचा अभाव तसेच पालिकेत शहरातून पाण्यासाठी येणाऱ्या दररोजच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेणारे सक्षम अधिकारी नाही.

शहरातील शिवकॉलनीची पाणी समस्या जैसे थे आहे. प्रयत्न करूनही शिवकॉलनीमध्ये विठ्ठल मंदिराच्या मागच्या भागात पाणी मिळत नाही म्हणून त्रस्त नागरिकांनी पुन्हा पालिकेत धडक दिली.

यात शंभर टक्के दिव्यांग नागरिकानेही सहभाग घेत पालिकेच्या चक्क वीस पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाणीपुरवठा विभागात संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना ‘अहो पाणी मिळेल का पाणी’ अशी आर्त हाक दिली.

दरम्यान, पाणी सदस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी महिला व नागरिकांनी केली. यावेळी पालिकेचे कनिष्ठ अभियंता सूरज नारखेडे यांनी आपण स्वतः जलवाहिनीची समक्ष पाहणी करून पाणी समस्या निवारण करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पंधरा दिवसांत तीन अधिकारी

शहरात पाणी समस्या गंभीर असताना पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांची पंधरा, वीस दिवस झाले बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्यापही नवीन पाणीपुरवठा अभियंत्यांची नियुक्ती झाली नाही. म्हणून पालिकेचे नगरअभियंता मुश्तहिद फारुकी यांच्याकडे पदभार होता. आता पालिकेचे वीज कनिष्ठ अभियंता सूरज नारखेडे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

"माझे कुटुंब दिव्यांग आहे. तीन, चार दिवसाआड तीनचाकी सायकलवर पाणी आणावे लागते. गेल्या तीन, चार वर्षांपासून सतत आमच्या भागातील नागरिक पालिकेत पायपीट करीत आहेत. तरी आमची समस्या आजपर्यंत सुटली नाही."

- नितीन महाजन, दिव्यांग रहिवासी, शिवकॉलनी, फैजपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT