Space Observatory
Space Observatory esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेरच्या जी. एस.मध्ये अवतरली आकाशगंगा..

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी. एस. हायस्कूलमध्ये अवकाश निरीक्षण केंद्राचे थाटात उदघाटन करण्यात आले.

भंडारी व वैद्य परिवाराच्या आर्थिक (Financial) मदतीतून हे केंद्र उभारण्यात आले आहे. (Khandesh Board of Education G S Grand Opening of Space Observatory in High School jalgaon news)

याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी. एस. हायस्कूलमध्ये १७ फेब्रुवारीला (कै.) रघुनाथ भंडारी यांच्या स्मरणार्थ तेजस्विता भंडारी-वैद्य यांच्या सौजन्याने अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्योपाध्यक्ष तथा शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, सेक्रेटरी ए. बी. जैन, माजी अध्यक्ष विवेकानंद भांडारकर, प्राचार्य एम. एस. वाघ, शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,

केंद्राचे देणगीदार प्रसाद वैद्य, उषा भंडारी, तेजस्विता भंडारी-वैद्य, कुलश्री भंडारी, गणेश सांगळे, विश्रांत कुलकर्णी, प्रदीप भंडारी, संदीप भंडारी, विशाल कुंभारे, आर. एल. माळी, सी. एस. पाटील, एस. बी. निकम आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक डी. एच. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी लंडनचे सहकारी तथा थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे शिष्य विशाल कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना अवकाश, ग्रह, तारे तसेच त्यासंबंधी घडणाऱ्या खगोलीय घटनांची माहिती दिली. या प्रसंगी देणगीदार तेजस्विता भंडारी-वैद्य,उषा भंडारी,

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

कुलश्री भंडारी यांनी या उपक्रमातून शाळा व संस्थेप्रती असलेली दातृत्वाची संकल्पना मांडली. शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे यांनी आपल्या भाषणातून अवकाश निरीक्षण केंद्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीचे पाऊल असल्याचे सांगितले.

आर. जे. पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर ए. ए. पाटील यांनी आभार मानले. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून उपशिक्षक एस. आर. पाटील व जी. एस. चव्हाण हे यापुढे काम पाहणार आहेत. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

सहजरीत्या पाहता ग्रह, तारे

या उपक्रमामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, नाशिक विभागातील अवकाश निरीक्षण केंद्र असलेली पहिली शाळा असल्याचा बहुमान शाळेला प्राप्त झाला आहे.

जवळपास अडीच लाख रुपये खर्चून हे अवकाश निरीक्षण केंद्र उभारण्यात आले असून, यात अत्याधुनिक दुर्बिणीचा समावेश आहे. त्यातून शुक्र, मंगळ, गुरू तसेच इतर ग्रह आपण सहजरित्या पाहू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT