vegetables News esakal
जळगाव

Jalgaon News : पालेभाज्या महागल्याने गृहिणींची वाढली कटकट; त्याच ‘त्या’ भाज्या खाऊन चिमुरडे वैतागले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मान्सून लांबतच चाललंय. दुसरीकडे विहिरीतील, कूपनलिकेमधील पाणीही कमी कमी होत चाललंय. यामुळे भाज्यांची आवक बाजारात कमी होत आहे. परिणामी, भाज्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.

रोजच्या रोज त्याच त्या पालेभाज्या खाऊन शाळकरी विद्यार्थ्यांना आता कंटाळा आल्याचे चित्र अनेक घरांत सध्या पाहावयास मिळत आहे. (leafy vegetables became more expensive housewives become in problem in making food Jalgaon News)

पाऊस लांबला, तरी दुसरीकडे शेतकरी, भाज्या घेणाऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. मेथी, शोपू पालक, आंबटचुका, गवार, भेंडी आदी भाज्यांचे दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

भाज्या महागल्यामुळे गृहिणीचे किचनचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांच्या आहारातून भाज्या आता बाजूला होत चालल्या आहेत. सर्वच डाळीही महाग झाल्या आहेत. सर्वसाधारण तूर, मसूर, मूग आणि उडीद डाळ साधारणपणे आपल्याकडे आहारात वापरतात.

मागच्या तीन आठवड्यांत डाळींच्या भावात मोठी वाढ झाली आहे. वास्तविकपणे पालेभाज्या आणि फळभाज्या महाग झाल्यास त्याला पर्याय म्हणून डाळींचा वापर वाढतो, पण सध्या भाज्या आणि डाळी दोन्ही महाग झाल्याने सर्वसामान्यांना त्याची झळ बसत आहे.भाज्या महागल्या, म्हणून गृहिणी मटकी, मूग, चवळी, हरभरा, वाटाणा या कडधान्याच्या भाज्या करण्यावर भर देत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाज्यांचे कडाडलेले किलोचे दर असे

*मेथी--८० ते १००

*वांगी (भाजीचे)--६० ते ८०

*भेंडी--७० ते ८०

*पत्ताकोबी--४० ते ५०

*ढोबळी मिरची--४० ते ६०

*बटाटा--२०

*गवार--६० ते ८०

*पालक--६० ते ८०

*काकडी--७० ते ८०

*फ्लॉवर--६० ते ७०

*हिरवी मिरची- ६० ते ८०

*शेवगा शेंगा--६० ते ८०

*भरिताचे वांगे--३० ते ४०

*कोथिंबीर--८० ते १००

*अद्रक--१६० ते २००

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"भाज्यांचे दर वाढल्याने किचनचे बजेट कोलमडले आहे. पावसाअभावी भाज्यांचे दर वाढल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे सिलिंडर, डाळींचे दरही वाढले आहेत. वाढत्या महागाइने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे."

-भाविका पाचपांडे, जळगाव

"पाण्याअभावी बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. भाज्यांचे दरच होलसेलमध्ये अधिक असतात. जादा दरात भाज्या घेण्यासाठी ग्राहक घसाघीस करतात. पाऊस पडला, की भाज्याची आवक काही दिवसांत वाढेल. तेव्हा दर आटोक्यात येतील."

गणेश पाटील, भाजी विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT