Life imprisonment for accused in murder of brother jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पिंप्राळा हुडको परिसरात दारू पिण्याच्या वादातून लाकडी दांडक्याने मारून सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (Life imprisonment for accused in murder of brother jalgaon Crime News)

खटल्याची पाश्‍र्वभूमी अशी : पिंप्राळा हुडको परिसरात प्रल्हाद तानू मरसाळे यांचा मुलगा दीपक मरसाळे आणि जय मरसाळे यांच्यात नेहमी दारू पिण्यावरून वाद होत होते. १८ ऑक्टोबर २०१९ ला रात्री साडेनऊच्या सुमारास दारू पिण्यावरून जय आणि दीपक यांच्यात वाद झाला.

यात रागाच्या भरात जय याने दीपकच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून खून केला, तर वडील प्रल्हाद मरसाळे यांना दुखापत केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जय मरसाळे याला अटक केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आठ साक्षीदार तपासले

जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर या खटल्याचे सुनावणी झाली. यात सरकारपक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात वडील प्रल्हाद मरसाळे, बहीण व भाचा यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

त्यावरून न्यायाधीश मोहिते यांनी जय मरसाळे याला दोषी ठरवत भावाचा खून व वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दंडांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील वैशाली महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार संजय गोसावी आणि केसवॉच इक्बाल पिंजारी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT