crime news esakal
जळगाव

Jalgaon News : पत्नीचा गळा चिरणाऱ्या पतीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : करगाव तांडा (ता. चाळीसगाव) येथे माहेरी गेलेल्या पत्नीचा मटण कापण्याच्या कोयत्याने गळा चिरून हत्या (Murder) केली होती. (Life imprisonment for husband who slit his wifes throat jalgaon news)

तीन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या खटल्यात दोषारोप सिद्ध झाल्याने जिल्‍हा न्यायालयाने संशयित युवराज कपूरचंद जाधव (वय ५०) यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

कौटुंबीक वाद झाल्याने पिंपरखेड तांडा (ता. चाळीसगाव) येथील युवराज जाधव याची पत्नी कविताबाई मुलगा व मुलगी दोघांना घेऊन करगाव तांडा येथे माहेरी निघून आली. भाऊ, वहिनी आणि दोघा मुलांसह १६ जून २०२० ला घराच्या गच्चीवर झोपले होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

संशयित युवराज शिडीवरून गच्चीवर चढला. रात्री दोनच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा मटण कापण्याच्या कोयत्याने गळा चिरून हत्या केली. याप्रकरणी मृताचा भाऊ सुनील राठेाड याच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात युवराजविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला हेाता.

या खटल्याची सुनावणी जिल्‍हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बी. एच. वावरे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाचे अभियोक्ता ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी साक्ष नोंदवून घेतल्या. त्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. त्यावरून न्यायाधीश वावरे यांनी त्यास जन्मठेप व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिला कैद, अशी शिक्षा सुनावली. आरोपी गुन्हा घडल्यानंतर २७ जून २०२० पासून कारागृहात असून, तेव्हापासून शिक्षेचा कालावधी गणला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : 'सरकारने विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करू नये; हमी मिळाली तर आजच उपोषण सोडेन' – सोनम वांगचुक

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT