crime
crime sakal
जळगाव

जळगाव : अनैतिक संबंधाचे प्रेम ठरले मातृत्वावर भारी!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अखंड पृथ्वीवर जर कुठे प्रेमाचा उल्लेख झालाच तर, मातृत्व सर्वच प्रकारच्या प्रेमांवर भारी ठरते. अशा या मातृत्वावर जळगावातील कठोर आईने काळिमा फासला आहे. मातृप्रेमापेक्षा तिला प्रियकराचे प्रेम श्रेष्ठ वाटत असल्याने आपल्या १४ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यासाठी प्रियकराला मूल सोपवलं अन्‌ त्याने पुरुषोत्तम ऊर्फ प्रशांतचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली. इतकेच नाही तर सर्व माहिती असतानाही संशयित आई मंगला मुलाच्या शोध घ्यावा म्हणून पोलिस, जिल्‍हाधिकारी, पालकमंत्र्यांना निवेदने देत सुटली.. अखेर पोलिसांनी या देाघांचे बिंग फोडलेच.

रविवारी (ता. १६) प्रशांत घरात असताना आई मंगला विलास पाटील हिने तिचा प्रियकर प्रमोद जयदेव शिंपी याला बोलावून घेतले. ‘हे काका तुला कबुतरांचा पिंजरा घेऊन देतील.. तू त्यांच्या सोबत जा..’ असे, म्हणत मुलाला प्रमोद शिंपी सोबत दुचाकीवर रवाना केले. मुलगा प्रशांत याला प्रमोद शिंपी व मंगलाच्या संबंधांची माहिती असल्याने प्रमोद त्याला मुळीच आवडत नव्हता.. कबुतर पाळायचे आहे या कारणाने तो प्रमोदच्या मोटारसायकलवर बसला. प्रमोदने ठरवल्यानुसार त्याला घेऊन यावल रावेरमार्गे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर गाठले. येथे आसिरगढ किल्ल्याजवळील निर्जन जंगलात नेऊन प्रमोदने प्रशांतचा दोरीने गळा आवळला. मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर प्रशांत पाटीलचा मृतदेह दोरीने झाडाला टांगून प्रमोद शिंपीने पळ काढला.

तक्रारीनंतर निवेदनांचा सपाटा

मुलगा हरवलाय म्हणून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर, जिल्‍हाधिकारी कार्यालयात, पोलिस अधीक्षक कार्यालयात मंगला पाटील हिने निवेदन सादर केले. हे कमी की काय म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मंत्र्यांना मुलाचा शोध लागावा, यासाठी निवेदन पाठवले गेले. मात्र, पोलिसांनी खरा चेहरा उघडा केलाच.

आसिरगढ एतिहासिक किल्ला.. पण!

बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) शहरापासून उत्तरेला सातपुडा पर्वतात तापी- नर्मदा नद्यांच्या खोऱ्याला जोडणाऱ्या आसिरगढ किल्ला हा मुगल शासकाचा महत्वाचा किल्ला होता. मात्र, तत्पूर्वी इतिहासकाळापासून या किल्याचा आणि दुर्गम पर्वताचा भाग गुरुद्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा याचा आत्मा येथे आधिवास करत असल्याचे बोलले जाते. पौर्णिमा- अमावस्येला शिवमंदिरात अश्वत्थामा दर्शनाला येत असल्याचीही दंतकथा असून भितीपेाटी सहसा दिवसाही कोणी या जंगल परिसरात येत नाही, याचा गैरफायदा घेत चिमुरड्या प्रशांत पाटीलला तेथे नेत प्रमोदने त्याची हत्या केली.

असा लागला छडा...!

चौदा वर्षांचा मुलगा बेपत्ता झालायं त्याचा शोध लागत नसल्याने एकामागून एक दिवस जात होते.. इकडे, मुलाच्या आई- वडिलांचे तक्रारी निवेदने सुरू होते. मुलाच्या आईवर(मंगला) संशय निर्माण झाल्यावर पोलिसांनी तांत्रिक माहिती घेण्यास सुरवात केली. तेव्हा प्रमोद जयदेव शिंपीचे नाव समोर आले. प्रमोद- मंगलाचे कथित संबंध, घटनेच्या दिवशी प्रमोदचे लोकेशन ट्रेस केल्यावर तो.. जलारामनगर ते बऱ्हाणपुर दाखवत होता. तर त्याच्या सोबचा मोबाईल अर्ध्यातून बंद झाला होता.. तोच मोबाईल मयत मुलगा प्रशांतच्या खिश्यात होता. टॉवर लोकेशनचा उलगडा होताच पोलिसांनी प्रमोद शिंपीला ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT