BHR 
जळगाव

बीएचआर घोटाळा: पुणे न्यायालयात सर्व ११ संशयित हजर

संशयितांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक लाखाचा वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केली.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या (BHR Credit Union) अवसायक काळातील घोटाळ्यात (Scam) पुणे आर्थिक गुन्हे शाखेने (Pune Economic Crimes Branch) अटक केलेल्या ११ संशयितांनी जामिनाच्या अटीशर्तीला अधीन राहून दुसऱ्या हप्त्याची रक्कम न्यायालयात जमा केली आहे. या सर्व संशयितांना २३ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामिनाची मुदत वाढवून मिळाली आहे.


रंजना खंडेराव घोरपडे यांच्या तक्रारीवरून डेक्कन पोलिस ठाणे (पुणे) येथे दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी राबवलेल्या दुसऱ्या अटकसत्रात भागवत भंगाळे, प्रेम कोगटा, संजय तोतला (तिन्ही, रा. जळगाव), जयश्री मणियार (रा. पाळधी), जयश्री तोतला (रा. मुंबई), जितेंद्र पाटील (रा. जामनेर), आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), छगन झाल्टे (रा. जामनेर), राजेश लोढा (रा. तळेगाव, ता. जामनेर) यांच्यासह प्रितेश जैन (रा. धुळे), अंबादास मानकापे (रा. औरंगाबाद) अशा अकरा संशयितांना अटक झाली होती.


३ कोटी १३ लाखांचा सशर्त जामीन

संशयितांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक लाखाचा वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केल्याने १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत परतफेड करायच्या ४० टक्के रकमेपैकी २० टक्के रक्कम १० दिवसांत जमा करण्याची प्रमुख अट होती. त्यानुसार सर्व संशयितांनी त्यावेळी न्यायालयात एकूण ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये भरले होते.

अशा रकमा असे संशयित

जयश्री तोतला (२९ लाख ३३ हजार ५९४ रुपये), अंबादास मानकापे (५४ लाख २३ हजार ३२८ रुपये), संजय तोतला (२० लाख ५८ हजार ७३४ रुपये), राजेश लोढा (२६ लाख २८ हजार९१२ रुपये), आसिफ तेली (२२ लाख ४२ हजार ४२५ रुपये), जयश्री मणियार (१७ लाख ९३ हजार ४१२ रुपये), प्रीतेश जैन (३० लाख २१ हजार ९९० रुपये), छगन झाल्टे (३४ लाख ३५ हजार ९९८ रुपये), जितेंद्र पाटील (१३ लाख ५१ हजार २९० रुपये), भागवत भंगाळे (२१ लाख ८ हजार), प्रेमनारायण कोकटा (४३ लाख २० हजार), असे सर्व संशयितांनी न्यायालयात एकूण ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये भरले होते.

दुसरा हप्ताही न्यायालयात जमा

बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसात पुन्हा या सर्व ११ संशयितांनी ठरल्याप्रमाणे दुसरा हप्ता भरला. परिणामी त्यांना (ता. २३ ऑक्‍टोबर)पर्यंत पोलिस स्थानकात हजेरी लावण्याची अट तूर्तास शिथील केली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला उर्वरित कामकाज होणार आहे.

झंवर कुटुंबाचे खाते गोठवले :

गुरुवारी पुणे विशेष न्यायालयातील एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात संशयितांचा फुल्ल कोरम राहिला, न्यायालयात हजर संशयितांना अंतरिम जामीन वाढवून मिळतो की, नाही यासह विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण यांचा जोरदार युक्तिवाद सुरूच असल्याने अनेकांची धडधड वाढल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT