fight of coronavirus sakal
जळगाव

दिलासा..सक्रिय रुग्णसंख्या ५ हजारांच्या खाली

दिलासा..सक्रिय रुग्णसंख्या ५ हजारांच्या खाली

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार (Jalgaon corona update) जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण आता पाच हजारांच्या आत आलेत. दिवसभरात नवे १६४ रुग्ण आढळून आले, तर ५६० रुग्ण बरेही झालेत. (jalgaon-coronavirus-update-active-patient-five-thousand-in-district)

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या (Jalgaon corona positive patient) कमी होत आहे. १ मेपासून तर सातत्याने रुग्णसंख्या कमी होऊन बरे होणारे रुग्ण वाढत आहेत. आता जूनमध्येही हाच ट्रेंड कायम आहे. बुधवारी ७ हजार ९९५ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १६४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ४० हजार ३०६ झाली आहे. तर ५६० रुग्ण दिवसभरात बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३३ हजारांवर पोचला आहे.

सक्रिय रुग्ण घटले

गेल्या २४ तासांत आणखी ४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बळींचा आकडा २५३९ झाला आहे. मार्च, एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने ‘पीक’ गाठला असताना सक्रिय रुग्णांची संख्या साडे अकरा हजारांवर पोचली होती. ती आता कमी होऊन ४ हजार ७५८ झाली आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ३२, अमळनेर १, चोपडा ३५, भडगाव १, यावल २, एरंडोल २, जामनेर ५, रावेर ११, पारोळा ६, चाळीसगाव २६, मुक्ताईनगर १५, बोदवड १.

लसीकरणाचे ४ लाखांवर लाभार्थी

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात आली. त्या प्रमाणात लशींचा साठाही बऱ्यापैकी उपलब्ध झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या लाभार्थींची संख्या ४ लाख ५ हजार ३६५ असून १ लाख २१ हजार १४७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. बुधवारी केवळ ६४२ जणांना पहिला तर ४७४ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

Maharashtra Monsoon: मुसळधार पावसानंतर अचानक उघडीप! घाटमाथा-कोकणात पावसाचा जोर ओसरला; IMD ने सांगितले कारण

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT