जळगाव

जळगाव जिल्ह्यातील रुग्ण बरे होणाऱ्यांचा दर ९४ टक्क्यांवर

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या (corona) नव्या बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून बरे होणारे वाढू लागले आहेत. मे अखेर आता जिल्ह्यातील रिकव्हरी रेट (Recovery rate) ९४ टक्क्यांवर पोचला आहे. रविवारी नवे १६१ रुग्ण समोर आले, तर ४३३ बरे झाले. चौघा जणांचा मृत्यू (Death) झाला.


(jalgaon district corona patient recovery rate ninety-four percent)

जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात (Corona control) येत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. १ मे पासून सातत्याने नवीन रुग्ण कमी होत आहेत. रविवारी सुमारे ८ हजार चाचण्यांचे अहवाल पाप्त झाले. पैकी १६१ नवे बाधित आढळून आले. एकूण रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार ८२७ झाली. तर ४३३ रुग्ण बरे झाले, बरे होणाऱ्यांचा एकूण आकडा १ लाख ३१ हजार ३८४वर पोचला आहे. रिकव्हरी रेट आता ९३.९६ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत चार रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५२८वर पोचला आहे.


चार तालुक्यांत रुग्ण नाही
ग्रामीण भागातही बऱ्यापैकी संसर्ग वाढलेला असताना आता दोन आठवड्यांपासून तालुक्यांमधील स्थितीही नियंत्रणात येत आहे. रविवारी चार तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. ८ तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या दहाच्या आत राहिली.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर २१, जळगाव ग्रामीण ६, भुसावळ २८, अमळनेर ४, पाचोरा २, भडगाव १, यावल १६, एरंडोल २, जामनेर ४, रावेर ६, पारोळा ७, चाळीसगाव ६३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT