जळगाव

भयंकर घटना : वीज थेट डोक्यावर पडली; दोन जण ठार !

डोक्यावर वीज पडल्याने डोके फाटून ते जागीच ठार झाले.

सकाळ वृत्तसेवा

कासोदा : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा जवळच असलेल्या तळई गावात आज दुपारी ढगाच्या गडगडाटसह पाऊस (Rain) झाला. यावेळी दोन वेगवेगळ्या भागात वीज (lightning) पडून दोन जण ठार (Death) झाल्याची घटना घडली. यात एका ५५ वर्षीय इसमाचा तर आठरा वर्षीय मुलाचा समावेश आहे. (lightning strike two parson death)

पहिल्या घटनेत विक्रम दौलत चौधरी (५५) हे पाऊस सुरु असल्याने हकेच्या अंतारावर असलेल्या शेताततून ते घरी परत येत होते. त्याच वेळी वीज थेट विक्रम चौधरी यांच्या डोक्यावर वीज पडल्याने डोके फाटून ते जागीच ठार झाले. मागून येणाऱ्या मजूर महिलांनी चौधरी हे मृत अवस्थेत पाहिल्यावर त्यांनी गावात माहिती दिली. त्यांचे शवविच्छेदन कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , सुना असा परिवार आहे.

झाडाखाली बसला आणि वीज अंगावर पडली

तळई गावाजवळच ब्राम्हण मळा भागात दुपारी दुसरी घटना घडली. स्वतःच्या शेतात गेलेला भूषण अनिल पाटील ( वय १८) हा गेला होता. पाऊस पडत असल्याने झाडाखाली आठ जणांच्या घोळक्यामध्ये मधोमध भुषण बसला. अचानक जोरात वीज कडाडून थेट भूषणच्या अंगावर पडली. बेशुद्ध भूषणला तातडीने तळई प्राथमिक आरोग्य केंद्रात नंतर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT