Ganesh Murti made 
जळगाव

अशी वेळ आतापर्यंत अनुभवली नाही..!

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे व शासनातर्फे लावण्यात येणाऱ्या विविधांगी निर्बंधांमुळे हा परिवार प्रचंड व्यथित झाला.

चंद्रकांत चौधरी



पाचोरा : येथील मूर्तिकार घोडके परिवार दोन वर्षांपासून पारंपरिक मूर्ती बनविण्याच्या (Ganesh Murti made) व्यवसायापासून (Business) प्रचंड व्यथित झाला असून, मूर्तिकार म्हणून तिसरी पिढी कार्य करीत असताना, अशी वेळ आतापर्यंत अनुभवली नाही, व्यवसाय चालवावा तरी कसा, अशी व्यथा घोडके परिवाराने व्यक्त केली.


रंगार गल्लीमधील घोडके परिवाराने १९४५ पासून गणपती बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. (कै.) नारायण घोडके त्यानंतर (कै.) प्रकाश घोडके व राजूशेठ घोडके यांनी हा व्यवसाय सांभाळला. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत मागणी वाढल्याने व्यवसाय वाढू लागला. जागा कमी पडू लागल्याने देशमुखवाडीत जागा घेऊन व्यवसाय वाढवला. गणपतीसोबत देवी मूर्तीही बनवण्यास सुरवात केली. मागणी जास्त वाढत गेल्यामुळे संपूर्ण परिवाराने दुसरा कुठलाही व्यवसाय न करता सर्वजण या व्यवसायात गुंतले.

घोडके परिवाराची तिसरी पिढी व्यवसायात

सध्या घोडके परिवाराची तिसरी पिढी या व्यवसायात सक्रिय आहे. राजू घोडके, शैला घोडके, प्रमिला घोडके, वैभव घोडके, प्रिया घोडके, गौरव घोडके या तिसऱ्या पिढीतील मूर्तिकारांनी सारोळा रोडवर जागा घेऊन व्यवसाय सुरू ठेवला आहे. घोडके परिवार अहोरात्र मेहनत करून आकर्षक लहान- मोठ्या मूर्ती घडवतात. सारा परिवार वर्षभर यातच गुंतलेला असतो व त्यावरच संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह चालतो.

कोरोनामूळे व्यवसाय अडचणीत

असे असताना गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे व शासनातर्फे लावण्यात येणाऱ्या विविधांगी निर्बंधांमुळे हा परिवार प्रचंड व्यथित झाला असून, मोठ्या परिश्रमाने बनविलेल्या मूर्ती विक्री होण्यात अडचणी येत असल्याने व्यवसायात गुंतवलेले भांडवल धोक्यात आले आहे व उदरनिर्वाह चालवणे जिकरीचे झाले आहे. शासनाने या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून मूर्तिकारांना मदत व सहकार्य करून हा व्यवसाय अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ

शेतकऱ्यांची दिवाळी गाेड! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८४६ कोटींची मदत'; नेमकी किती जणांना मिळाली मदत?

IND vs AUS 1st ODI Live: १० मिनिटांच्या पावासनं १ षटक कमी झालं... आता तर एक तास झाला पाऊस पडतोय; जाणून घ्या किती षटकांची मॅच होणार

Diwali 2025: दिवाळीत दमा अन् सीओपीडीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा एका क्लिकवर

Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

SCROLL FOR NEXT