जळगाव

शेतीवरून वाद विकोपाला; एकाचा मृत्यू..नातेवाइकांचा रास्ता रोको

रात्री सव्वाआठच्या सुमारास नातेवाइकांनी महामार्गावर येत रास्ता रोको केला

संजय पाटील



पारोळा : सुमठाणे (ता. पारोळा) (paraola) येथे शेतीच्या किरकोळ कारणावरून दोन जणांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी (ता. ५) मृत्यू (death) झाला. या प्रकरणी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा (Murder crime) दाखल करावा, या मागणीसाठी पुरुष, महिला व मुले यांनी तब्बल पाच तास ठिय्या करत आंदोलन केल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत परस्पर २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(parola dispute over agriculture kills one)

सर्जेराव आसाराम पाटील हे २२ एप्रिलला सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने शेती नांगरत असताना मनोहर शालिग्राम पाटील आला. त्यावेळी दोघांमध्ये शेतावरून वाद झाला. घरी आल्यावर मनोहर पाटील, सुनील शालिग्राम पाटील यांच्यासह अकरा जणांनी (सर्व रा. सुमठाणे) लाथाबुक्यांनी, तसेच काठीने सर्जेराव पाटील यांना बेदम मारहाण केली, शिवीगाळही केली, अशी फिर्याद सर्जेराव पाटील यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल (parola police Station) करण्यात आला होता.

याबाबत दुसऱ्या गटानेही गुन्हा दाखल केला. त्यात गावातील गणपत बळिराम पाटील हे २२ एप्रिलला सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या ओट्यावर बसलेले असताना गावातील सर्जेराव आसाराम पाटील, गुलाब आसाराम पाटील यांच्यासह दहा जणांनी (सर्व रा. सुमठाणे) फिर्यादी गणपत पाटील यांना दारूच्या नशेत मारहाण केली. याबाबत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील जखमी सर्जेराव आसाराम पाटील यांचा बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुमठाणे येथे मृत्यू झाला. या प्रकरणी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून शव पोलिस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलिसांनी आवर घालून शवविच्छेदन करून आपण ३०२ कलम लावू असे सांगितले असता, नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. खुनाचा गुन्हा दाखल करा, आरोपींना अटक करा, अशी मागणी केली.

महामार्गावर नातेवाईंकाचा रास्ता रोको


या वेळी रात्री सव्वाआठच्या सुमारास नातेवाइकांनी महामार्गावर येत रास्ता रोको केला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करीत नातेवाइकांना बाजूला सारत महामार्ग मोकळा केला. मृताचा मुलगा सागर पाटील याने संबंधित संशयितांविरोधात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करावा, असा अर्ज पोलिसांना देत वडिलांचे शवविच्छेदन हे इनकॅमेरा करण्यात यावे, अशी मागणी केली. दरम्यान, रात्री उशिरा जळगाव येथे मृतदेह नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्टेशन डायरीत नमूद करण्यात आले.

पोलिस ठाण्यात ठिय्या..

या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक संतोष भंडारे हे पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. मृताच्या नातेवाइकांनी दुपारी तीनपासून सुरू केलेला आक्रोश रात्री साडेनऊपर्यंत सुरू होता. पोलिसांनी या घटनेतील काही संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, सर्व संशयितांना अटक करा, अशी मागणी मृताच्या नातेवाइकांनी लावून धरली होती.

(dispute over agriculture kills one)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: One Last Time! रोहितने सिडनीतून केलं ऑस्ट्रेलियाला अलविदा, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये या वर्षांत तब्बल दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण!

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

Prashant Kishor Challenges BJP : प्रशांत किशोर यांचं भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान; म्हणाले, ''हिंमत असेल तर...''

SCROLL FOR NEXT