BJP,Shivsena,Ncp, Congress Election esakal
जळगाव

Market Committee Election : बोदवडला आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना भाजप युतीची सरळ लढत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल व शिवसेना(शिंदे गट) व भाजपचे शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. (Market Committee Election NCP Shiv Sena BJP alliance straight fight jalgaon news)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने चर्चा करताना आडमुठी भूमिका घेत काँग्रेसचे उमेदवारही आम्हीच ठरवू, अशी भूमिका घेतल्याने आघाडी झाली नाही. ही आमची फसवणूक असून, त्या मुळे आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला व आमच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरेंद्रसिंग पाटील यांनी दिली.

माघारीच्या दिवशी एकूण १६९ पैकी १२५ जणांनी अर्ज मागे घेतले. दरम्यान, आज माघारीच्या दिवशी आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही वेळ तहसील कार्यालयात भेट दिली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, भाजपचे अशोक कांडेलकर, नंदू महाजन, वरणगाव माजी नगराध्यक्ष सुनील काळे, काँग्रेसचे डॉ. जगदीश पाटील, निरीक्षक संजय पाटील, विरेंद्रसिंग पाटील हे बाजार समितीचे आवारात उपस्थित होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळी नऊपासून नाडगाव रस्त्यावरील दाल मिलमध्ये आघाडीची चर्चा करण्यासाठी ठाण मांडून बसले होते. काँग्रेसला दोन जागा देण्याचे निश्चितही झाले होते, पण ऐनवेळी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी माघारीचा निर्णय घेतला व आघाडी फिसकटल्याचे खापर राष्ट्रवादी पक्षावर फोडले गेले. यामुळे काँग्रेसची निवडणुकीत काय भूमिका राहील, याचे तर्कवितर्क लावले जात असून, आमदार चंद्रकांत पाटील व एकनाथ खडसे यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली असून, प्रतिष्ठा राखण्यात कोणाला यश येईल, याची खंमग चर्चा रंगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT