anil bhaidas patil esakal
जळगाव

Anil Bhaidas Patil: आता माघार नाही... 3 पक्षांसोबत आगामी निवडणुका : मंत्री अनिल पाटील

सकाळ वृत्तसेवा

Anil Bhaidas Patil : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे प्रतोद तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आगामी काळात अनेक राजकीय बदल घडतील असे सुतोवाच करतानाच, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका सत्तेतील तिन्ही पक्ष एकत्रित लढवतील असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. (Minister Anil bhaidas Patil statement Upcoming elections with 3 parties jalgaon political)

अमळनेर येथील निवास्थानी त्यांची भेट घेवून चर्चा केली असता, त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचे आपण साक्षीदार होतो.

त्यावेळी सर्व ठरवूनही माघार घ्यावी लागली होती. आता आम्ही भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्वांनी चर्चा करून ठरवून घेतला. आता कोणत्याही परस्थितीत माघार होणार नाही.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा नेता भाजपसोबत येण्याची चर्चा सुरू आहे, यावरूनच समजून घ्या. आगामी काळात मोठे राजकीय बदल होणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार होणार

मंत्रिमंडळ विस्ताराच्या केवळ चर्चा होतात, प्रत्यक्षात विस्तार होत नाही, याबद्दल छेडले असता श्री. पाटील म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. एक कॅबनेट मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे.

त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचा आणखी एक कॅबिनेट व काही राज्य मंत्री होणार हे निश्‍चित आहे. १५ ऑगस्टपूर्वी पालकमंत्रिपदांचे नव्याने वाटप होण्याची शक्यताही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणुका

अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबद्दल विचारले असता, त्यांनी त्याविषयी बोलण्यास नकार दिला. मात्र, आगामी काळात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगट एकत्रित लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. त्यात कोणताही बदल होणार नाही. या सर्व निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

‘पाडळसरे’ला चार हजार कोटींची ‘सुप्रमा’ लवकरच

अमळनेर तालुक्याला प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे, त्या माध्यमातून आपण तालुक्याचा विकास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील पाडळसरे धरणाचे काम वेगाने होत आहे.

मात्र, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामापेक्षा भूसंपादन मोबदला व पुनर्वसनासाठी लागणारा खर्च अवाढव्य आहे. अनेक वर्षांपासून हे काम रखडल्याने प्रकल्पाची किंमत आवाक्याबाहेर गेली. त्यातूनच मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पुढील कामही वेगात व्हावे यासाठी आपण १७ टीएमसी पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामाच्या दोन टप्प्यासाठी एकाच वेळी मंजुरी आणणार आहोत. आता लवकरच त्यासाठी ४ हजार ९८१ कोटींची ‘सुप्रमा’ (सुधारित प्रशासकीय मान्यता) घेण्यात येईल.

अजितदादांकडेच अर्थखाते असल्याने प्रस्ताव मान्यतेसह कॅबिनेटची मंजुरी व केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत प्रकल्पाचे काम करण्यासाठी पाऊले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT