Minor girl abused in Chalisgaon Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलास घर भाड्याने देणाऱ्या महिला ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील करगाव तांडा येथील अल्पवयीन मुलीवर तिच्याच गावातील अल्पवयीन मुलाने आत्महत्येची व तिच्या घरच्यांना फसविण्याची धमकी देत तिच्याशी इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले.

आरोपी अल्पवयीन मुलाने पीडित मुलीस पाटणादेवीला जायचे आहे, असे सांगून चाळीसगाव शहरातील रामकृष्णनगर मालेगाव रोड येथील महिलांच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.(Minor girl abused in Chalisgaon Jalgaon Crime News)

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल होऊन संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून, संबंधित मुला-मुलींना शरीर संबंधासाठी राहते घर भाड्याने देणाऱ्या रामकृष्णनगरातील दोन महिलांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ‘पोस्को’अंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित अल्पवयीन मुलाने अत्याचार करून ही बाब तिने कोणालाही सांगितली तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सदर धमकीमुळे घाबरून अल्पवयीन मुलीने ही घटना कोणालाही सांगितली नाही. या धमकीचा आधार घेऊन अल्पवयीन आरोपी मुलाने पुन्हा त्या अल्पवयीन मुलीस त्याच घरातील खोलीत नेऊन तिचे इच्छेविरुद्ध शरीर संबंध केले.

त्यानंतर तिसऱ्यांदा अल्पवयीन मुलाने पीडित अल्पवयीन मुलीस पुन्हा आत्महत्या करण्याची व त्यात तिची कुटुंबीयांना फसवण्याची धमकी देऊन तिला दुचाकीने नांदगाव येथे नेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही बाब तिच्या नातेवाईकांना माहित झाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण व स्टाफ यांनी या मुला-मुलीचा शोध घेऊन संबंधित अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन आरोपी मुलाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

त्यानंतर अल्पवयीन मुलीस विश्वासात घेऊन तिच्या नातेवाईकांनी व पोलिसांनी विचारपूस केली असता वरील सर्व घटनेबाबतची सविस्तर माहिती तिने तिचे नातेवाईक व पोलिसांना दिली. त्यावरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ, जळगाव यांच्यासमोर हजर केले.

गुन्ह्यात आरोपी अल्पवयीन मुलाला पीडित अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी राहते घरातील एक खोली पाचशे रुपये घेऊन उपलब्ध करून देणाऱ्या संशयित शीतल ज्ञानेश्वर राठोड (वय ५१) व लता दीपक पाटील (वय ४५) (दोन्ही महिला (रा. प्लॉट नंबर ७२, रामकृष्णनगर, मालेगाव रोड, चाळीसगाव) यांना या गुन्ह्यात ‘पोक्सो’अन्वये अटक करण्यात आली आहे.

दोन्ही महिलांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याने त्यांची रवानगी जिल्हा कारागृह जळगाव येथे करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख व पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.

"अल्पवयीन मुला-मुलींना पैसे घेऊन लैंगिक गैरकृत्यासाठी घरातील खोली, लॉजमधील रूम, कॅफे सेंटरमधील रूम आदी उपलब्ध करून दिल्यास संबंधित व्यक्तींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल." - ज्ञानेश्वर जाधव, पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे, चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT