suresh bhole esakal
जळगाव

Jalgaon News : नाल्याचे पाणी दीपनगर वापरणार : आमदार सुरेश भोळे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील सांडपाणी दीपनगर औद्योगिक वीज केंद्रात वापरण्यात येणार आहे. यासाठी ‘महाजेनको’ महापालिकेला या प्रकल्पासाठी सहकार्य करणार आहे.

त्यामुळे महापालिकेने अमृत २.० चे काम लवकर करावे, असे आदेश आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ८) अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.(MLA Suresh Bhole statement of Deepnagar will use drain water jalgaon news)

आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी आयुक्त डॉ. गायकवाड, सहाय्यक आयुक्त अश्‍विनी भोसले- गायकवाड तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी आमदार भोळे यांनी विविध विभागातील कामांचा आढावा घेतला.

शासनाकडून महापालिकेला शहरातील सांडपाण्यासंदर्भात आलेल्या आदेशाची माहितीही दिली. ते म्हणाले, शहरातील सांडपाणी दीपनगर वीज केंद्राला देण्यात येणार आहे. त्यासाठी अमृत २.० ची सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी. दीपनगर येथे सांडपाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेत महाजेनेको सहकार्य करणार आहे.

यातून महापालिकेला दरमहा उत्पन्नही मिळणार आहे. भुसावळ येथील सांडपाणीही दीपनगर वीज केंद्राला देण्यात येणार आहे.

पथदीप सुरू करा

शहरातील एक हजार पथदीप बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले, की आता दिवाळीचे दिवस आहेत. त्यामुळे ज्या भागात पथदीप बंद असतील ते तातडीने सुरू करण्यात यावेत, कोणत्याही भागात पथदीप बंद ठेवू नका.

रस्त्याची कामे वेगाने करा

शहरातील रस्त्याच्या कामाबाबतही आमदार भोळे यांनी आदेश दिले. महापालिकेच्या निधीतून जी रस्त्याची कामे सुरू आहेत, ती वेगाने पूर्ण करण्यात यावी, तसेच ज्या भागात डागडुजी करावयाची आहे. त्या भागात तातडीने सुरू करण्यात यावी.

शहरातील काही रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली तरी महापालिकेने त्या कामावर सुपरव्हिजन करावे. त्या कामाकडे लक्ष द्यावे. त्यांच्याकडून कामास विलंब होत असेल किंवा काम व्यवस्थित होत नसेल तर माहिती द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT