More than 100 vehicles transporting illegal sand were seized in administrative building jalgaon news
More than 100 vehicles transporting illegal sand were seized in administrative building jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : अवैध वाळूच्या वाहनांची भरली जत्रा; 3 वर्षांपासून वाहने पडून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा असलेल्या प्रशासकीय इमारतीत अवैध वाळू वाहतूक करणारी सुमारे शंभरपेक्षा अधिक वाहने जप्त करून ठेवली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही वाहने जप्त केली असून, दर वर्षी त्यात भर पडत आहे. (More than 100 vehicles transporting illegal sand were seized in administrative building jalgaon news)

जिल्हा प्रशासन जप्त केलेल्या वाहनचालकांकडून दंड वसूल करणार अन्‌ केव्हा ती जागा मोकळी होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

वाळूचे लिलाव झालेले नसताना नदीपात्रातून वाळूची चोरी करणे, क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून वाहतूक करणे आदी कारणांनी महसूल, पोलिस पथकाच्या छाप्यात अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली.

दोन ते तीन वर्षांपासून वाळूसह जप्त केलेल्या वाहनांना दंड चारपट लागतो. हा दंड भरण्यापेक्षा नवीन वाहन घेणे डंपर, ट्रक्टर, ट्रकमालकांना परवडते. यामुळेच जप्त केलेली वाहने दंड न भरता तेथेच पडू देणे हा पर्याय वाहनमालकांनी निवडलेला दिसतो. यामुळेच तीन वर्षांत शंभरापेक्षा अवैध वाळू वाहतुकीची जप्त केलेली वाहने आहे तशीच आहेत.

वाळू चोरी अधिनियम कायद्यानुसार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना दंड लाखांच्या घरात जातो. वाहन जप्त केल्यानंतर तहसीलदार कार्यालयातर्फे कायदेशीर बाब म्हणून संबंधित वाहनांच्या मालकांना नोटिसा देऊन दंड भरण्यास सांगितले जाते. त्यांनी तो न भरल्यास काही वेळ वाट पाहून त्या वाहनांचा लिलाव करून दंड वसूल केला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, वाहन जप्त केलेले वाहनधारक दंड भरण्यास अनुकूल नसतात. यामुळे अशा वाहनांचा लिलाव केला जातो. मात्र, कोरोनापासून अशा वाहनांचा लिलाव झाला नसल्याचे चित्र आहे. यामुळे प्रशासकीय इमारतीत अनेक नागरिक विविध कामानिमित्त येतात. त्यांचे लक्ष या वाहनांच्या संख्येवर व त्यातील वाळूवर जाते. यामुळे सहजच तोंडातून शब्द निघतात, ‘अवैध वाळूच्या वाहनांनी जत्रा भरली आहे’.

पोलिसांची नियुक्ती

कोरोनापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूची जप्त केलेली वाहने चोरीस गेली आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासकीय इमारतीत दोन पोलिस नेहमी बंदोबस्ताला असतात. मात्र, ही वाहने आता भंगार होत असून, अनेकांची टायर पंक्चर झाली आहेत. अनेकांमध्ये साप, विंचू, पालींचा वावर आहे. लवकरात लवकर या वाहनांचा लिलाव जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे.

"जप्त केलेल्या अवैध वाळूच्या वाहनांना दंड आकारला जातो. वाहन जप्त केले जाते. दंड न भरल्यास काही कालावधीत वाहनांचा लिलाव होतो. तशी नोटीस संबंधित वाहनमालकाला दिली जाते. जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल." -विशाल सोनवणे, प्रभारी तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT