accident  esakal
जळगाव

Jalgaon News : कानळदा रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक; आमोद्याचा तरुण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तालुक्यातील कानळदा रोडवर के. सी. पार्कजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत (Accident) एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

ही घटना मंगळवारी (ता. २८) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. (motorcyclist died on the spot in a head on collision between two bikes near KC Park jalgaon news)

जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गणेश सोमा सपकाळे (वय ३२, रा. आमोदा खुर्द, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, आमोदा खुर्द (ता. जळगाव) येथील गणेश सपकाळे डंपरवर चालक होता. असोदा येथील मालकाकडे मंगळवारी दिवसभर काम करून रात्री गावातील मित्र समाधान प्रल्हाद बाविस्कर (रा. आमोदा खुर्द) याच्यासोबत दुचाकीने तो आमोदा खुर्द गावाकडे गेला.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कानळदा रोडवरील केसी पार्क येथे रात्री साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गणेश सपकाळे जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र समाधान बाविस्कर आणि समोरील दुचाकीवरील जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपुते (रा. कांचननगर, जळगाव) असे तिघे गंभीर जखमी झाले.

या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसानही झाले आहे. बुधवारी (ता. १) जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या पश्चात आई उषा, वडील सोमा गोविंदा सपकाळे, लहान भाऊ गोपाल, पत्नी छाया, मुलगा जयेश आणि मुलगी असा परिवार आहे. याबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक फौजदार रवींद्र सोनार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT