jalgaon zp
jalgaon zp jalgaon zp
जळगाव

जळगाव : महापालिकेत नामंजूर वार्षिक अहवालाला परस्‍पर मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्‍हा परिषदेचा(jalgaon jilha parishad) वार्षिक प्रशासन अहवालात(Annual Administration Report) ग्रामपंचायतींनी दाखविलेल्या चुकीच्‍या कर वसुलीवरून सदरचा प्रशासकीय अहवाल मागील सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आला होता. यानंतरदेखील सदरचा अहवाल सर्वसाधारण सभेला नामंजूर करता येत नसल्‍याचे दाखवून त्‍यास परस्‍पर मंजुरी देण्याचा कारनामा ग्रामपंचायत विभागाने केला. या प्रकारावरून आज (ता. ३)च्‍या सर्वसाधारण सभेत सत्‍ताधारी व विरोधक आक्रमक झाले.जिल्‍हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.३) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. अध्‍यक्षा रंजना पाटील अध्‍यक्षस्‍थानी होत्‍या. तर ऑनलाईन सभेतला मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपाध्‍यक्ष लालचंद पाटील, सभापती जयपाल बोदडे, रवींद्र पाटील, ज्‍योती पाटील, उज्‍वला माळके, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी स्‍नेहा कुडचे यांच्‍यासह सदस्‍य उपस्‍थीत होते.(Mutual approval of rejected annual report in Municipal Corporation Jalgaon)

काटेंना सूचक ठेवत अहवाल मंजुरी

ऑनलाईन सभेचे कामकाज सुरू झाल्‍यानंतर शिवसेनेचे नानाभाऊ महाजन यांनी नामंजूर प्रशासकीय अहवालाला मंजूरी कशी? असा मुद्दा उपस्‍थीत केला. विशेष म्‍हणजे यास मंजुरी देताना भाजचे मधू काटे यांचे अनुमोदक म्‍हणून नाव आहे. सभेला ही माहिती दिल्‍यानंतर अनुमोदक असलेले काटेदेखील थक्‍क झाले. अहवाल मंजूर करायचा असेल तर अनुमोदक म्‍हणून नाव काढून टाकण्याची मागणी काटे यांनी केली.

तर प्रशासनानेच व्‍हावेसूचक : अनुमोदक

सदरच्‍या मुद्यावर बोलताना ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी प्रशासकीय अहवाल नामंजूर करण्याचा अधिकारी सर्वसाधारण सभेला नसल्‍याचे सांगितले.यावरून सदस्‍य अधिकच आक्रमक झाले. असे असेल तर उपमुख्‍य कार्यकारी अधिकारींनी सूचक व सीईओंनी अनुमोदक व्‍हावे; अशी संतप्‍त प्रतिक्रीया सदस्‍यांनी व्‍यक्‍त केली. गैरहजर बीडीओंना नोटीसजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला गटविकास अधिकारी हजर नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.यानंतर सर्व गटविकास अधिकाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. यात चाळीसगाव व जामनेर गटविकास अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले. यावरून गैरहजर गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश अध्‍यक्षा रंचना पाटील यांनी दिले.

मनपाकडून करवसुली

जळगाव महापालिका हद्दीत असलेले जिल्‍हा परिषद मालकीचे शिवतीर्थ मैदानाला महापालिका व्‍यावसायिक कर आकारणी करते. जर महापालिका शिवतीर्थ मैदानासाठी कर आकारत असेल तर महापालिका ग्रामपंचायत हद्दीत कचरा टाकण्यासाठी जागा वापरत आहे. जळगाव तालुक्‍यातील खेडी, आव्‍हाणे, सावखेडा येथे कचरा टाकत असून या ग्रामपंचायतीनेदेखील मनपाकडून कर वसूल करण्याची मागणी सदस्‍यांनी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जळगाव गटविकास अधिकारी यांना शुक्रवारपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT