Bus Stand
Bus Stand esakal
जळगाव

Crime News : मौल्यवान वस्तूंसाठी नवे बसस्थानक सर्वांत असुरक्षित; चोरटे मुक्कामी अन्‌ पोलिसांची ये-जा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon New : नवीन बसस्थानक महिलांसह त्यांच्या मौल्यवान दागिने, वस्तूंसाठी सर्वांत असुरक्षित ठिकाण बनलंय. बसस्थानकाच्या मध्यभागी वर्कशॉप गेटजवळच महिलेच्या पर्समधून ६९ हजार रुपयांची सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. (new bus stand has become most unsafe place for women as theft cases rising jalgaon crime news)

याबाबत मंगळवारी रात्री जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील बसस्थानक चोरट्यांच्या ताब्यात गेल्याची परिस्थिती असून, नेहमीप्रमाणे तक्रार दाखल करण्याची औपचारिकता जिल्‍हापेठ पोलिसांनी केली.

शहरातील नवीन बसस्थानकातून रोज एका महिलेची पर्स किंवा दागिने, गळ्यातील पोत नाहीच तर प्रवाशाच्या पाकिटाची चोरी होतेच. शाळकरी मुलांना लागलेल्या उन्हाळी सुट्या, लग्नसराईमुळे बसस्थानक गर्दीने ओसंडून वाहत आहे. त्यात माहेरवाशीण महिलांची मोठी गर्दी उसळत असून, या गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी चोरट्यांनी नवीन बसस्थानकाला अड्डा बनविला आहे.

घटनांची मालिका सुरूच

मंगळवारी (ता. २) सानपाडा (मुंबई) येथील विवाहिता सुनीता मधुकर ठाकूर (वय ३५) जळगावहून किनगाव (ता. यावल) येथे जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. बसची वाट बघत असताना, बस आगारात वर्कशॉप गेटजवळच त्यांच्या पर्सची चेन उघडून चोरट्याने सोन्याचे दागिने, मंगळपोत, लक्ष्मीहार, असा ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला. पर्समधून चोरी झाल्याचे लक्षात येताच सुनीता ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पोलिस चौकी उघडीच, पण...

उन्हाळी सुट्यामुळे वाढलेली गर्दी आणि चोरीच्या घटनांची सरबत्ती पाहता, आपल्या तोकड्या पोलिस दलातून निरीक्षक बबन अव्हाड यांनी एक कर्मचारी बसस्थानक ड्यूटीवर नियुक्त केला आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते रात्री आठ, अशी ड्यूटी पोलिस कर्मचाऱ्याला असते. ड्यूटी संपताच एक जातो, तर दुसरा मात्र त्याच्या सोईने पोचतो. तोपर्यंत ‘चार्ज’ आवारातच दडून असलेल्या चोरट्यांकडे असतो. तोही फेरफटका मारून निघून जातो. त्यामुळे पुन्हा चोर शिरजोर होतात.

चौकीची दैनावस्था

बसस्थानकाचे नूतनीकरण झाले तेव्हा पोलिस चौकी ही संकल्पनाच नष्ट करण्यात आली होती. मात्र, जनमानसांचा रेटा आणि वाढत्या गुन्ह्यांमुळे तात्पुरती चौकी उभारण्यात आली. या चौकीत पोलिसांना धड बसायला खुर्ची नाही.

मोडकळीस आलेली खुर्ची बळजबरी ठेवली आहे. एकटाच कर्मचारी ड्यूटी बजावत असल्याने टंगळमंगळ करून त्याची ड्यूटी सुरू असते. गोंधळ उडाल्यावर पोलिस ठाण्यात फोन जातो, तेव्हा ठाणेअंमलदार ड्यूटीवरील त्या पोलिसांना फोन करून घटना कळवतो. मग तो तेथे येऊन कर्तव्य बजावतो.

सीसीटीव्ही बंदावस्थेत

बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमरे मेंटेनन्सअभावी बंदावस्थेत आहेत. ते सुरू आहेत त्यांचा पाहिजे तसा उपयोग होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हेगार आणि चोरट्यांचा वाढता उपद्रव पाहता सीसीटीव्हींची संख्या वाढवून संपूर्ण आगार सीसीटीव्हीच्या निगराणीत आल्यास चोरट्यांवर निर्बंध तर लागेलच. मात्र, ड्यूटीवर असणाऱ्यांवरही लक्ष ठेवता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT