crime news  esakal
जळगाव

Nimkhedi Crime Case : पोलिस कोठडी उलटूनही शस्त्र सापडेना!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील मेहरूणमधील रहिवासी व विद्यापीठातील कंत्राटी कामगार प्रमोद ऊर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३) याचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. दोन संशयितांना अटकही झाली. मात्र, संशयित तपासात सहकार्य करीत नसल्याने पोलिसांना गुन्ह्यात वापरलेले शस्त्र सापडलेले नाही. (Nimkhedi Crime Case Weapons not found after suspect turning over police custody jalgaon crime news)

प्रमोद शेट्टी शनिवार (ता. १०)पासून बेपत्ता होता. सोमवारी (ता. १२) निमखेडी शिवारात गिरणा नदीकाठावरील महादेव मंदिराजवळ त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तालुका पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी मृताच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांत बेपत्ताची तक्रार दिली होती.

खुनाचा उलगडा झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी माहितीच्या आधारे सुनील ऊर्फ समीर नियामतखाँ तडवी (वय २८), सत्यराज नितीन गायकवाड (२६, रा. गणेशनगर) यांना अटक केली. संशयितांना तालुका पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी संशयितांना न्यायालयात हजर करून शुक्रवार (ता. १६)पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी मिळविली. वरिष्ठ निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

शस्त्रच सापडेना

दोघा संशयितांनी प्रमोद ऊर्फ भूषण याच्यासोबत मद्यप्राशन केले. नंतर त्याचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरला व सर्वांगावर ज्या शस्त्राने वार केले. त्याची माहिती दिली. पोलिस कोठडीची मुदत संपत आलेली असतानाही संशयितांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र अद्याप काढून दिलेले नाही. मात्र, संशयितांचे कपडे जप्त करण्यात आले आहेत.

"संशयितांची कोठडीत चौकशी सुरू आहे. तपासाच्या अनुषंगाने कपडे, शस्त्र आदी पुराव्यांची माहिती देता येत नाही. संशयितांना त्याचा फायदा मिळू शकतो, म्हणून आम्ही ती टाळतो. आवश्यक सर्व बाबी तपासात समोर आल्या आहेत."

-रामकृष्ण कुंभार, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT