Chopda Farmers Cooperative Sugar Mills News esakal
जळगाव

Jalgaon News : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत नऊ जागा बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२८ या पंचवार्षिक कालावधी संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, सोमवारी (ता. ३०) माघारीचा दिवस होता.

सर्वपक्षीय नेत्यांनी माघारीच्या मुदतीपर्यंत बिनविरोधसाठी खूप प्रयत्न केले. यात काहीअंशी यश आले तर काही गटांत काही उमेदवारांनी माघार न घेतल्याने अखेर चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली.

भाडेतत्त्वावर गेलेल्या ‘चोसाका’च्या सत्तेच्या खुर्चीसाठी मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. यात २१ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्यात तर उर्वरित १२ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. (Nine seats unopposed in Chopda Farmers Cooperative Sugar Mills elections 25 candidates in fray for twelve seats Some success for all party leaders for unopposed Jalgaon News)

पाच ऊस उत्पादक गटापैकी अडावद, गोरगावले बुद्रुक, चहार्डी हे तीन गटातील नऊ उमेदवार बिनविरोध झाले आहेत तर उर्वरित दोन ऊस उत्पादक गटात निवडणूक लागली असून, यात...

चोपडा गटातून : चंद्रहास गुजराथी, प्रवीण गुजराथी, गोपाल पाटील, पंडित पाटील.

हातेड गट : चोसाका माजी उपाध्यक्ष शशिकांत देवरे, संजयकुमार पाटील, शिवाजी पाटील, चंद्रकांत सोनवणे, साहेबराव सोनवणे.

संस्था मतदारसंघ : डॉ. सुरेश पाटील, चेतन महाजन, जगन्नाथ पाटील, जगदीश पाटील.

महिला राखीव मतदारसंघ : कल्पना पाटील, लताबाई पाटील, विजया पाटील, मीनाक्षी सोनवणे.

इतर मागासवर्ग मतदारसंघ : निंबा पाटील, नितीन पाटील, आशाबाई पवार,

अनुसूचित जातीजमाती मतदारसंघ : मीराबाई बाविस्कर, ज्ञानेश्वर भादले, भरत कोळी.

विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ : शरद धनगर, प्रकाश रजाळे असे एकूण १२ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

बिनविरोध उमेदवार असे..

तीन ऊस उत्पादक गट बिनविरोध झाले, यात अडावद गटात : दिनकर देशमुख, दिलीप धनगर, दत्तात्रय पाटील, गोरगावले बुद्रुक गट : अनिल पाटील, ॲड. घनशाम पाटील, नारायण पाटील, चहार्डी गट : गोपाल धनगर, प्रशांत पाटील, सुधाकर पाटील या नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न

चोसाका बिनविरोधासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली. त्यास काही प्रमाणात यश मिळाले असले तरी चोसाकाची निवडणूक अखेर लागली असून, नेत्यांचा खटाटोप प्रकल्प वाचविणे व बिनविरोध होण्यासाठी रविवारी (ता. २९) दिवसभर खलबते झाली. दोन बैठका झाल्या, पण यात काहीअंशी यश आले आहे. माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, पीपल्स बँक अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, माजी जिल्हा परिषद सदस्य, डॉ. सुरेश पाटील, माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, माजी संचालक नारायण पाटील कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील, आशिष गुजराथी, आश्रमशाळा अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मेहमूद बागवान, आत्माराम म्हाळके, ॲड. एस. डी. पाटील, चंद्रशेखर पाटील, रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांच्यासह पदाधिकारी प्रयत्न केले.

अपक्षही रिंगणात

बैठकीत जागा वाटपासह अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी यावर घोडे अडले. यामुळे चर्चा फिस्कटली असून, माघारीपर्यंत एकमत झालेच नाही. अखेर काही गटांचा तिढा सुटला असला तरी काही गटात मात्र निवडणूक होणार असल्याने अपक्ष ही रणांगणात उभे ठाकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT