Covaxin vaccine sakal
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात केवळ ६५ टक्के ‘लसवंत

ज्येष्ठांचा लसीकरणाचा टक्का वाढेना; नियम करूनही लस घेईनात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित कवच म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. मात्र, अद्यापही जिल्ह्यात ३५ टक्के नागरिक लसीकरणाबाबत बेफिकीर आहेत. ६५ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेऊन ते सुरक्षित झाले आहेत. इतर ३५ टक्के नागरिकांचे काय? त्यांना कोरोना संसर्ग झाला तर ते इतरांना बाधित करतील. यामुळे लस न घेणाऱ्या नागरिकांचे काय करायचे, असा प्रश्‍न जिल्हा आरोग्य विभागासमोर उभा राहिला आहे.(vaccination campaign)

केंद्र सरकार निर्देशानुसार १६ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात संसर्ग प्रतिबंधात्मक कर्मचारी, ६० वयोगटांतील व्यक्तींसाठी स्वर्ग प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. १ मार्च २०२१ पासून १८ ते ४५ वयोगटांसह सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख ३६ हजार ३२५ आहे. लसीकरणास पात्र लोकसंख्या ३४ लाख सहा हजार ६०० असून, आतापर्यंत पहिली लस २७ लाखांवर, तर दुसरी लस १५ लाखांवर नागरिकांनी घेतली आहे. दोन्ही टप्प्यांतील एकूण ४१ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे.(Jalgaon news)

पहिल्या लाटेची टक्केवारी केवळ ६५ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार एकानेही कोरोना प्रतिबंधक लस घेतली, तर कोरोनाला माणूस दूर ठेवू शकतो. त्या व्यक्तीला कोरोना होईल. मात्र, तो जीवघेणा नसेल. उपचाराअंती कोरोनामुक्त ती व्यक्ती होईल. यामुळे शासन, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन लसीकरणाचा प्रत्येकाला आग्रह धरत आहे.

हे असू शकतात उपाय

ज्या नागरिकांनी लसीकरण करून घेतलेले नाही, अशा ठिकाणी त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठित नागरिकाने समुपदेशन केले तर नागरिक लस घेतील. लस घेतल्याचे व न घेतल्याचे परिणाम, दुष्परिणाम तेथील नागरिकांना समजावून सांगितले पाहिजेत. सोबतच त्याची फलकाद्वारे जनजागृती करायला हवी. वेळ पडली तर शासनाकडून कठोर निर्णय घेऊन लसीकरणाची सक्ती करता येऊ शकते. पल्स पोलिओसारखी घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबविता येईल.

कोरोना महामारीला हरविण्यासाठी शंभर टक्के लसीकरण हाच पर्याय आहे. त्यासाठी ज्यांना या महामारीपासून स्वतःला सुरक्षित करायचे असेल, त्यांनी स्वतःहून लसीकरण करून घेणे आवश्‍यक आहे. जे नागरिक लस घेत नाहीत, त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी, त्या समाजातील प्रतिष्ठितांनी त्यांचे लस घेण्यासाठी समुपदेशन केले पाहिजे.

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT