jaykumar ratnani  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पाचोऱ्याच्या व्यापाऱ्याचे मलेशियात अपहरण? कुटुंबीयांची खासदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे आपबिती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील मूळ रहिवासी तथा पावणेदोन वर्षांपासून मलेशियात गेलेले चॉकलेट उत्पादक तथा व्यापारी जयकुमार रतनानी (वय ४०) यांचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात असून, रतलानी कुटुंबीयांनी खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आपबिती कथन केल्याने भारतीय दूतावासामार्फत रतनानी यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.(Pachora trader kidnapped in Malaysia jalgaon crime news )

जयकुमार रतनानी पाचोरा येथील मूळ रहिवासी असले तरी त्यांनी काही वर्षे जळगाव येथे चॉकलेटचा कारखाना चालविला. त्यानंतर ते पावणेदोन वर्षांपूर्वी मलेशियात व्यापारासाठी गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या २२ ऑक्टोबरला त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ‘मी कार्यक्रमात आहे, नंतर बोलतो’, असे संभाषण झाले होते. त्यानंतर मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही.

त्यांच्या पत्नी भाविका यांनी पती जयकुमार यांच्याशी बोलण्यासाठी अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आले व त्यांनी रतनानी यांच्याशी बोलण्यासाठी बँक खात्यात पैसे टाकण्याचे सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले व पतीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे तपासाअंती ‘अवांग नारुलहदी’ असे मोबाईल करणाऱ्या व्यक्तीचे नाव निष्पन्न झाले आहे.

भाविका रतनानी यांनी संबंधित व्यक्तीशी फोनवर बोलणे झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु त्या बँक खात्यात रक्कम ट्रान्स्फर होत नसल्याने त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता संपर्कही झाला नाही.

त्यामुळे भाविका रतनानी यांच्यासह कुटुंबीयांनी खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे कैफियत मांडली असता खासदार पाटील यांनी केंद्रीय मंत्रालयामार्फत मलेशियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भारतीय उच्चायुक्त आयोगाच्या समुपदेशकांशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून रतलानी यांचा शोध घेण्यासंदर्भात प्रयत्न चालवले आहेत.

दूतावासाच्या माहितीनुसार मलेशियातील कोणत्याही पोलिस ठाण्यात रतनानी यांचे अपहरण झाल्यासंदर्भात नोंद नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रतनानी यांच्या बेपत्ता प्रकरणी गुंतागुंत वाढली असून, रतनानी कुटुंबीय कमालीचे व्यथित व चिंताग्रस्त आहेत.

''जिल्हा प्रशासन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या संपर्कात असून, खासदार उन्मेष पाटील यांच्यामार्फत मलेशियातील भारतीय दूतावासाशी संपर्क सुरू आहे. मलेशियन पोलिसांनी जयकुमार रतनानी यांच्या बेपत्ता होण्यासंदर्भातील नोंद घेऊन त्यांचा शोध सुरू केला आहे. जिल्हा प्रशासन सर्वार्थाने संबंधित यंत्रणांशी संपर्कात असून, प्रयत्न निश्‍चितच यशस्वी होतील.''- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

SCROLL FOR NEXT