Cyber Fraud esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : तरुणाची 23 लाखांत फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा डाव

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तुम्हाला कमी व्याजदरात ऑनलाईन (Online) कार व बिजनेस लोन मंजूर करून देतो, असे सांगून तरुणाकडून वेळोवळी जीएसटी, डॉक्युमेंटसह प्रोसेसिंगच्या फीच्या नावाखाली पैसे उकळले. (Plot of cyber criminals under guise of private finance company 23 lakh fraud of youth jalgaon news)

तरीही कर्ज मिळत नसल्याने तगादा लावतो, म्हणून रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी फाईल पकडल्याचे सांगत २३ लाख २४ हजारांत तरुणाची फसवणूक केली.

आव्हाणे (ता. जळगाव) शिवारातील पवार पार्कमधील साहील वसंतराव गाढे खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. त्याला कर्जाची आवश्यकता असल्याने त्याने महेश चव्हाण यांच्याशी संपर्क करून कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. कर्जाची फाईल मुंबईच्या मुख्य शाखेत गेली.

त्यांचा सीबिल कमी असल्याचे सांगून ते वाढवून देण्यासाठी गाढे यांनी त्यांना २० हजार रुपये दिले. रेकॉर्ड वाढल्यानंतर मुख्य शाखेतील पूजा चौहान यांनी त्यांना ४० लाख रुपयांचे बिजनेस लोन मंजूर करीत असून, त्यासाठी लागणारा सेटअप ते स्वत: दाखवून गाढे यांची फाईल मंजूर करून देत आहे.

काही दिवसानंतर पूजा चौहान यांनी गाढे यांना फोन करून कंपनीच्या ऑडिटमध्ये आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या लोनची फाईल पकडली असून, त्या अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यासाठी १० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्यापोटी गाढे यांनी त्यांना ४ लाख ८५ हजार रुपये ऑनलाईन पाठविले. लोनची फाईल क्लीयर करण्यासाठी पूजा चौहान यांनी साहिलकडून वेळोवेळी ऑनलाईन २३ लाख २४ हजार रुपये उकळले.

तरीही त्यांच्याकडून पुन्हा पैशांची मागणी केली जात होती. या प्रकाराबाबत गाढे यांनी महेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. पूजा चौहान लोनचे न देता पैशांची मागणी करीत असल्याचा प्रकार जुलै २०२२ मध्ये उघडकीस आला. गाढे यांनी त्यांच्याकडे दिलेले पैसे व्याजासह परत करण्याची मागणी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.

गाढे यांच्या पत्नीने अनेकदा पूजा चौहान यांच्याशी बोलून ‘तुम्ही लोन मंजूर करून द्या, तुम्हाला दिलेली रक्कम आम्ही नातेवाईक, मित्रांकडून व्याजाने घेतली आहे. आम्हाला घरदार विकून त्यांचे पैसे परत करावे लागतील’, असे सांगितले.

मात्र, पूजा चौहान हिच्या आईने पूजाची तब्येत ठीक नसल्याचे सांगत, तुम्ही पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देऊ लागले. फसवणूक झाल्याचे समजाल्यानंतर साहिल गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT