police station level personnel doing parties with sand mafia jalgaon crime news 
जळगाव

Jalgaon Crime News : वाळूमाफियांसोबत ‘जाम पे जाम’; भडगाव पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जिल्‍हाधिकारी आयुषप्रसाद आणि जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु असताना पोलिस ठाणे पातळीवरील कर्मचारी वाळू माफियांसोबत जाम-पे-जाम पार्ट्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्यासंबंधी व्हिडीओ चित्रीकरण प्राप्त झाल्यावरून भडगाव पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (police station level personnel doing parties with sand mafia jalgaon crime news)

भडगाव पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत कार्यरत आणि कलेक्शनची कामे करत असलेल्या स्वप्नील आणि विलास पाटिल या दोघांचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी निलंबन केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वाळूमाफियांसोबत आयोजित पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काउंटर गुन्ह्यांची ‘थिअरी’

भडगाव पोलिस ठाण्यात काऊंटर गुन्ह्याची नवी थिअरी वापरली जात आहे. पहिल्या घटनेत गौणखनिज चोरीचा ट्रॅक्टरची माहिती तहसीलदारांना दिल्यावर त्यांनी ट्रॅक्टर थांबवायला लावला अन्‌ चक्क पत्रकाराच्याच अंगावर ट्रॅक्टर आणला गेला. या घटनेत तब्बल महिनाभर गुन्हा दाखल करण्यास पोलिस निरीक्षकांनी टाळाटाळ केली.

तत्कालीन जिल्‍हाधिकारी अमन मित्तल यांनी जनता दरबारात तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना जाब विचारल्यानंतर संबंधित गौणखनिज वाहतूकदाराचे ट्रॅक्टर ताब्यात घेत सरकारी फिर्याद देण्याऐवजी अंगावर ट्रॅक्टर आणल्या प्रकरणी पत्रकाराला तक्रार देण्यास भाग पाडले.

पत्रकाराने फिर्याद दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटात समोरच्या व्यक्तीला बोलावून काऊंटर फिर्याद दाखल करून घेण्यात आली.

दुसऱ्या घटनेत गावातील विभक्त राहत असलेल्या बापलेकात वाहनाचा व्यवहार होता. मात्र, वाहनाचा अपघात होवून वाहनाचे मोठे नुकसान झाल्याने विमा कंपनीद्वारे पित्याला १ लाख १० हजार रुपये प्राप्त झाले. यावरुन वाद होऊन पोलिस ठाण्यात प्रकरण आले. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सेटलमेंट घडवून आणली. दोघा पक्षाकडून चहा-पाणी मिळवले.

आता मुलगा म्हणतोय माझे १ लाख १० हजारांचे काय? तुम्ही जबाब घेतल्याचे कागदपत्र द्या अशी मागणी केल्यावर पोलिसांनी त्या मुलास पिटाळून लावले. तिसऱ्या घटनेत भडगावच्या पेठ भागातील शेतकरी तसेच पत्रकार भावेश पाटील याने भडगाव पोलिस ठाण्याचे दोघेही पार्टी करत असतानाचे दिसल्यावर त्याने चित्रण केले. तेच चित्रण गावात व्हायरल झाल्याने भडगाव निरीक्षकांच्या सूचनेवरुन चित्रण करणाऱ्या या तरुणावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT