Pradeep Raisoni is once again preparing to enter Municipal Election jalgaon news
Pradeep Raisoni is once again preparing to enter Municipal Election jalgaon news esakal
जळगाव

Municipal Election 2023 : प्रदीप रायसोनी पुन्हा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

कैलास शिंदे

जळगाव : शिवसेनेचे नेते, आमदार सुरेशदादा जैन यांच्या निवडणुकीचे ‘चाणक्य’, महापालिका प्रशासनावर पकड ठेवून शहर विकासाला वेगळा आयाम देणारे जळगावचे माजी महापौर प्रदीप रायसोनी (Pradeep Raisoni) पुन्हा एकदा जळगाव महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election 2023) रिंगणात उतरण्याची तयार करीत असल्याचे दिसून येत आहे. (Pradeep Raisoni is once again preparing to enter Municipal Election jalgaon news)

त्यांनी ‘घरकुल’ प्रकरणाच्या सद्यपरिस्थितीत आपल्याला निवडणूक लढता येईल काय, याची थेट विचारणा राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगानेही जळगाव महापालिका निवडणूक विभागकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगाव नगरपालिका आणि महापालिकेच्या कारभारात १९८५ ते थेट २००७ पर्यंत पदाधिकारी म्हणून प्रदीप रायसोनी यांनी काम केले आहे. नगरपालिका ते महापालिका कार्यकाळात सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. मात्र, कारभाराचे सर्व सूत्रधार श्री. रायसोनी होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील अनेक योजना राबविल्या गेल्या.

याशिवाय आमदार सुरेशदादा जैन जळगाव विधानसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा निवडून आले. विशेष म्हणजे त्यांना पक्षाचे कोणतेही बंधन नव्हते. ते ज्या पक्षात गेले, त्या पक्षातून ते विधानसभेत विजयी झाले आहेत. त्यांच्या कार्यावर जनतेचा विश्‍वास होता. मात्र, त्यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन प्रदीप रायसोनी यांच्याकडूनच होत असे, त्यात यशही मिळत होते.

त्यामुळे त्यांना ‘चाणक्य’ही म्हटले जात होते. मात्र, ‘घरकुल’ प्रकरणाच्या अगोदरपासून प्रदीप रायसोनी महापालिकेसह सुरेशदादा जैन यांच्या राजकारणापासून वेगळे झाले होते. त्यानंतर उघड झालेल्या ‘घरकुल’ प्रकरणात त्यांनाही शिक्षा झाली होती. त्यामुळे ते राजकारणापासून पूर्णपणे अलिप्तच राहिले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

आजपर्यंत त्यांचे राजकारणात उतरण्याबाबत कोणतेही वक्तव्य नाही व कोणतेही संकेतही नाहीत. मात्र, ‘घरकुल’ प्रकरणातील परिस्थितीच्या अनुषंगाने आपण निवडणूक लढवू शकतो काय, अशी विचारणा त्यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली आहे. त्यांच्या या पत्राची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने जळगाव महापालिकेकडून त्याबाबत घेतली आहे.

महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की राज्य निवडणूक आयोगाने प्रदीप रायसोनी यांनी पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने माहिती विचारली. आम्ही ती माहिती त्यांना दिली आहे. मात्र, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतला, याची कोणतीही माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही.

मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

महापालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२३ मध्ये या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत प्रदीप रायसोनी उतरण्याची शक्यता आहे. ते या निवडणुकीत उतरल्यास जळगाव महापालिका निवडणुकीतील राजकीय चित्र वेगळे असेल, हे मात्र निश्‍चित. मात्र, अद्याप तरी प्रदीप रायसोनी यांच्याकडून तसे संकेत नाहीत. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यानंतरच त्याची उकल होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

LTTE Ban: राजीव गांधींची हत्या करणाऱ्या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली; मोदी सरकारचा निर्णय

The Great Indian Kapil Show: "मुलींसारखे कपडे घालून लोकांच्या मांडीवर बसणे, हे घृणास्पद!"; 'द कपिल शर्मा' शोवर भडकला कॉमेडियन

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Marathi News Live Update: मोदी-शहांना दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या द्वेषपूर्ण भाषणांविरोधी याचिक

SCROLL FOR NEXT