Crime sakal
जळगाव

Jalgaon Crime News : चिनावलच्या तरुणाचा मुक्ताईनगरजवळ खून; मारेकऱ्यांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : नवीन मुक्ताबाई मंदिराच्या मागे सातोड शिवारात बोदवड रस्त्यावर चिनावल (ता. रावेर) येथील तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी (ता. ६) सकाळी उघडकीस आली. (Ravindra Madhukar Patil was killed jalgaon crime news)

सातोड शिवारात मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यालगत असलेल्या नाल्यात वृंदावन हॉटेलजवळ मंगळवारी (ता. ६) दुपारी दोनपूर्वी दगड, टणक वस्तूंच्या व हत्याराच्या साह्याने मारहाण करून रवींद्र मधुकर पाटील (वय ४६) याचा खून केल्याची घटना घडली आहे. मारेकऱ्यांनी रवींद्रच्या तोंडावर, डोक्यावर, नाकावर व चेहऱ्यावर जबर मारहाण करून ठार मारले.

घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे, परीक्षाविधीन डीवायएसपी सतीश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दोनगहू, पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडे व पोलिस कर्मचारी व फॉरेन्सिक पथक दाखल होऊन तपासणी केली. संदीप दोनगहू तपास करत असून, मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, मृत रवींद्र हा चिनावल येथील रहिवासी असून, तो पतसंस्थेमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली. त्याचे लग्न झालेले आहे व अपत्य देखील असल्याची माहिती मिळाली आहे.

त्याची मोटरसायकल मुक्ताईनगर शहरात आढळून आल्याची ही माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान तो मुक्ताईनगर येथे कशासाठी आला व त्याचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला, या बाबी अद्यापही अस्पष्ट असून पोलिस त्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT