Chili
Chili red chili rate hike due to unseasonal rain jalgaon news
जळगाव

Red Chili Rate Hike : लाल मिरचीचा ग्राहकांना ठसका; दरवाढीमुळे गृहिणींचे गणित कोलमडले

संजय पाटील

Jalgaon News : दैनंदिन वापरात येणाऱ्या लाल तिखट मिरचीचा भाव वाढल्यामुळे गृहिणींचे गणित कोलमडले आहे. परिणामी दरवर्षी साठवणूक करण्याच्या प्रमाणात बराचसा बदल झालेला आहे. (red chili rate hike due to unseasonal rain jalgaon news)

दरवर्षी उन्हाळ्यात गृहिणी वडे, पापड, कुरडई यास इतर सर्व वस्तूची साठवणूक ठेवत असतात. या वस्तूंबरोबर दरवर्षी लागणारे धान्य तसेच लाल मिरची वर्षभर पुरेल त्या पार्श्वभूमीवर महिला वर्ग खरेदी करतात. मात्र वाढता दर व अवकाळीच्या फटक्यामुळे लाल मिरचीचा भाव गगनाला भिडला आहे.

खानदेशात लाल मिरची घेण्यासाठी ग्राहकांची नेहमी पसंती असते. खानदेशी लाल मिरची ही गुजरात येथे देखील बरेचशे खानदेशी मंडळी वापरासाठी घेऊन जातात. मात्र यंदा लाल मिरचीच्या भाव वाढीमुळे ग्राहकांची संख्या मंदावली असून, व्यापाऱ्यांचा बराचसा माल पडून आहे.

दरम्यान, तालुक्यात सर्वाधिक वापरली जाणारी खानदेशी गावरानी मिरचीचा आजचा भाव २८० ते ३२० रुपये किलो आहे. त्यामुळे बरेचसे ग्राहक पाहिजे त्या प्रमाणात लाल मिरचीची साठवणूक करत नसून पॅकिंग मिरचीचा वापर करून आपली गरज भागवीत आहे.

सध्या बाजार समितीच्या आवारात लाल मिरची विक्री केंद्र दुकाने असून,भाववाढीमुळे या परिसरात ग्राहकांची संख्या नगण्य दिसून येत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यान, लाल मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गृहिणींचे गणित कोलमडले आहे. मुख्यत्वे करून लाल मिरची ही दैनंदिन जीवनाच्या खानपानात अत्यंत महत्त्वाची असून, घरगुती वापराबरोबर हॉटेल व्यावसायिक देखील लाल मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

सध्या स्थानिक भागासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी ठिकाणांहून लाल मिरचीची प्रामुख्याने आवक असते. यंदा मात्र राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे स्थानिक भागातून लाल मिरचीचे उत्पन्न कमी होत असल्यामुळे परिणामी मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. बाजारपेठ परिसरात लाल मिरचीची आवक कमी असल्यामुळे हे दर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

लाल मिरचीचे प्रतिकिलो दर

अरुनीमा..............२५० ते ३००

खानदेशी गावरानी....२८० ते ३२०

घंटूर...................२५० ते २८०

रसगुल्ला..............७०० ते ८५०

रेशम पट्टी.............३२० ते ४००

काश्मिरी...............५५० ते ७००

"दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल मिरचीचा व्यवसाय होत होता. मात्र यंदा वारंवार येणारा अवकाळी पाऊस तसेच उत्पन्न कमी असल्यामुळे लाल मिरचीचे सर्व प्रकारचे भाव तेजीत आहेत. मजूर लावून देखील पाहिजे त्या प्रमाणात विक्री होत नसल्यामुळे माल पडून आहे." - दिनेश नावरकर, विक्रेता, पारोळा

हळदीसह मसालेही महागले

घरगुती मसाले तयार करण्यासाठीही ग्राहकांची मोठी लगबग सुरू आहे. भारतीय आहारात मसाल्याचे महत्त्व अधिक असून, खाण्यापिण्याच्या आहार पद्धतीनुसार मसाला हा तयार केला जातो. मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या तेजपानसह विविध वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. यात चांगल्या दर्जाची अख्खी हळद, तेजपान, हिरवी वेलची, दालचिनी, काळे मिरे, कर्णफूल, दगडफूल, रामपत्री, जावत्री, त्रिफळा आदींचे भावही काही प्रमाणात वाढले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT