beating esakal
जळगाव

Jalgaon Crime : राजकारणी तरुणीशी प्रेमविवाह केल्याचा राग अनावर; घरात घुसून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सावखेडा (ता. रावेर) येथील एका तरुणाने जळगाव येथील एका राजकारणी नातेसंबंध असलेल्या तरुणीशी प्रेमविवाह करून तिला आपल्या घरी आणले. (Relatives of girl broke into house of love married young man and beat up his family jalgaon crime news)

परंतु याचा राग आलेल्या मुलीच्या नातेवाइकांनी थेट सावखेडा गावी जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या घरात घुसून तरुण, त्याचे आई, वडील व नातेवाईक यांना मारहाण केली. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी २६ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार सावखेडा येथील तरुणासह संबंधित तरुणीने मर्जीने बऱ्हाणपूर येथील न्यायालयात नोटरी पद्धतीने गायत्री संस्कार ट्रस्ट, रेणुकानगर बऱ्हाणपूर येथे नोंदणीकृत विवाह केला.

याचा तरुणीच्या नातेवाइकांना राग आल्याने सुमारे २० ते ४० तरुणांनी चारचाकी वाहन व इतर मोटारसायकलवर येऊन त्यांनी घरात घुसून लोखंडी रॉडने घरातील साहित्याची नासधूस केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच तरुणाच्या आई, वडिलांना रॉडने मारत असताना तरुणाच्या भावाने त्यांना आडवले असता त्याच्या तोंडावर व डाव्या हाताच्या पंजास दुखापत केली. ओढाताणीत तरुणाच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे पोत तोडून नुकसान केले.

काहींनी तरुणासह आजीला लोखंडी रॉडने वार केले. तसेच विवाहित तरुणीची इच्छा नसताना तिला बळजबरीने घरातून ओढून तिला कारमध्ये जळगाव येथे घेऊन गेले. या प्रकरणी पाच ते सहा प्रमुख संशयितांसह २० ते २५ जणांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस, पाणी सलाईन घेण्यास नकार

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT