Jalgaon District Collector Aman Mittal esakal
जळगाव

Jalgaon News : वाळूमाफिया, बोगस बियाणे विक्रेते ‘रडार’वर; अमन मित्तल यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीने कहर करून कळस गाठला असून, ही वाळू वाहतूक रोखणे व शासनाच्या नियमानुसार वाळू वितरण करणे या संदर्भात संपूर्ण यंत्रणा अलर्ट केली असून, विना क्रमांकाची वाहने, अवैध वाळू वाहतूक व बोगस बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक या गोष्टीकडे कदापी दुर्लक्ष होणार नाही व असा प्रकार करणाऱ्यांची गय करणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. (Sand mafia bogus seed sellers on radar warns district collector Aman Mittal jalgaon news)

जिल्हाधिकारी मित्तल हे अधिकाऱ्यांची बैठक व महसूल कामकाजाची पाहणी करण्यासाठी बुधवार (ता. २८) दिवसभर पाचोरा येथे होते. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्यांचे कर्तव्य व जबाबदारी संदर्भात जाणीव करून दिली. कर्तव्यात व कायदा नियमावलीच्या विरोधात कामकाज केल्यास कारवाईचा इशाराही दिला.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी प्रांताधिकारी दालनात त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्पष्ट केले, की ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमास सुरुवात झाली असून, हे अभियान प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा आराखडा तयार करून तो शासन दरबारी सादर होणार आहे.

संपूर्ण अहवालप्राप्त झाल्यानंतर अवघ्या २१ दिवसांत संपूर्ण योजनांना मंजुरी देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या असल्याचे सांगून शिधापत्रिका व अवैध वाळू वाहतुकीसंदर्भातील हेल्पलाइनचा वापर सर्वांनी करावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपल्या मागण्या व तक्रारी हेल्पलाईनवरून टाकल्यास त्याची दखल घेतली जाईल. ज्यांना रेशन मिळत नाही त्यांची यादी तयार केली जाणार असल्याचे सांगून एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहू देणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच बीएलओमार्फत मतदार नोंदणी करून मतदार याद्या अपडेट करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले.

वाळू वाहतुकीवर सर्व शासकीय यंत्रणांची करडी नजर राहणार असून, विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉली, डंपर मिळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. केवळ वाळू वाहतुकीसंदर्भातील ही कारवाई नसेल तर आरटीओ विभागाच्या माध्यमातूनही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून बोगस बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही.

पाऊस सुरू झाल्याने आता पेरण्यांना प्रारंभ होणार असून, याच काळात शेतकरी गडबडीत असल्याने त्यांची फसवणूक होते. फसवणूक करणाऱ्यासंदर्भात तक्रारी आल्यास त्याची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. विद्यार्थी, शेतकरी यांना योग्य वेळेत योग्य ते प्रमाणपत्र व कागदपत्र मिळण्यासंदर्भातही निर्णय घेतला असल्याचे सांगून जनतेला वेठीस धरणाऱ्या व कामात अकारण विलंब करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी विविध संस्था संघटनाची निवेदने जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्वीकारली. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात चर्चा करून निवेदन दिले. अग्रवाल समाज मंडळाच्या वतीने मित्तल यांचा सन्मान करण्यात आला.

कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शहर व तालुक्यातील विविध प्रश्न व समस्यांना वाचा फोडणारी मते मांडली. त्यात वन विभाग, पाणीपुरवठा, शासकीय कार्यालयांमधील अनागोंदी, अस्वच्छता, अधिकाऱ्यांची नागरिकांसंदर्भातील अनास्था या संदर्भात मांडलेल्या प्रश्नांना मित्तल यांनी समर्पक उत्तरे देऊन जनतेला वेठीस धरणे, कामात कसूर करणे, कामास विलंब करणे व कायद्याविरुद्ध असलेली कृती खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे, प्रशिक्षणाची जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, नायब तहसीलदार संभाजी पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: जळगावात भाजपाचे तीन सदस्य बिनविरोध विजयी

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT