sand  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शासकीय आवारातून वाळूचा ट्रॅक्टर पळविला; सहाय्यक तलाठी यांना धक्काबुक्की करुन चालक पसार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बेकायदेशीर उत्खनन करुन अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील आवारात जमा करण्यात आले होते.

नुकत्याच आणलेल्या या ट्रॅक्टरची नोंद करीत असतानाच ट्रॅक्टर चालक अजय समाधान कोळी (रा. निमखेडी, ता. जि. जळगाव) याने सहाय्यक तलाठी यांना धक्काबुक्की करून व बॅरीकेट्स तोडून हे ट्रॅक्टर पळवून नेले. (sand tractor taken away from government premises jalgaon crime news)

बुधवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. अवैध वाळू वाहतूकीस आळा घालण्यासाठी नियुक्त केलेल्या महसूल विभागाच्या पथकात म्हसावद येथील सहाय्यक तलाठी आकाश विजय काळे यांची नेमणुक करण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. १०) श्री. काळे यांच्यासह पथकातील कंडारीच्या तलाठी प्रज्ञाराणी वंजारी, नांद्रा येथील तलाठी राजकन्या घायवट, पोलीस अंमलदार अजय ठाकूर यांना उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी अजिंठा चौकात बोलावले. या ठिकाणी त्यांनी विना क्रमांकाचे वाळूने भरलेले वाहन थांबवून ठेवले होते.

पथक पोचल्यानंतर संशयीत ट्रॅक्टर पथकाच्या ताब्यात देवून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना श्री. सुधळकर यांनी दिल्या. त्यानुसार पथकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला मोकळ्या मैदानात आणले.

याठिकाणी ट्रॅक्टरची वाळू वाहतुकीच्या रजिस्टरमध्ये नोंद घेत असतानाच चालक अजय कोळी याने सहाय्यक तलाठी श्री. काळे यांना धक्का मारला आणि त्याठिकाणी लावलेले बॅरीकेट्स तोडून ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चालक कोळी याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक शांताराम देशमुख तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT