Jalgaon District Court esakal
जळगाव

Jalgaon News : अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर लवकरच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम होणार असून, यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी ५९ लाख ५८ हजार इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. (second floor will be constructed on additional district court building jalgaon news)

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे शासन आदेश ११ एप्रिलला काढण्यात आले आहेत. अमळनेर न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत असून, या न्यायालयातील वाढते कामकाज आणि वाढते खटले यामुळे ही इमारत अपुरी पडू लागली होती.

त्यामुळे न्यायालयीन प्रशासनास आहे त्या जागेत कामकाज भागवावे लागत होते, ही गरज आमदार अनिल पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन विधी व न्याय विभागाने याच इमारतीवर एक मजला बांधकाम करण्यास परवानगी दिल्याने मोठा प्रश्न सुटला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

एकंदरीत या निधीत अतिरिक्त मजल्यासह सुशोभीकरण आणि सुविधा देखील वाढविण्यात येणार असल्याने संपूर्ण न्यायालय परिसराचे रूपच बदलणार आहे. या बांधकाम मान्यता मिळविल्याने अमळनेर वकील संघाने आमदार अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले असून, या मंजुरीबद्दल आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

...असे होणार बांधकाम

या इमारतीवर बांधकाम करताना बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर, पाणीपुरवठा आणि मलनिसारण, अंतर्गत व बाह्य विद्युत पुरवठा, अग्निशमन यंत्रणा, संरक्षण भिंत, मैदान सुशोभीकरण, वाहनतळ, भूसपाटीकरण, सीसी ड्रेन आणि सीडी वर्क, जमिनीखालील पाण्याची टाकी, मुख्य पाण्याची टाकी, पंप हाऊस, बोअरवेल, वातानुकूलित यंत्रणा, उदवहन, अंतर्गत स्वच्छतागृह, एबी रूम, एरिया लाईट, पंप, जनरेटर, सीसीटीव्ही आदी कामे केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT