railway
railway esakal
जळगाव

Jalgaon News : रावेरला रेल्वे इंजिनमधून धूर; स्टेशन मास्तरांमुळे अनर्थ टळला...!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळकडून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या सुरत - भागलपूर एक्स्प्रेसच्या इंजिनच्या चाकातून ठिणग्या आणि धूर निघत असल्याचे लक्षात आल्याने येथील स्टेशन मास्तरांनी गाडी रेड सिग्नल देत गाडी थांबवली. (Seeing sparks and smoke coming from engine wheel of Surat Bhagalpur Express station master stopped train jalgaon news)

चाकात आवश्यक ती दुरुस्ती करून ४० मिनिटांनंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. स्टेशन मास्तरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.

मंगळवारी (ता. ६) दुपारी ४:३६ वाजता २२९४७- डाउन या क्रमांकाची सुरत भागलपूर एक्स्प्रेस भुसावळकडून बऱ्हाणपूरकडे जात होती. ही गाडी रावेर रेल्वेस्थानकातून १०० किलोमीटर प्रती तास या वेगाने जात असताना स्टेशन मास्तर दिलीपकुमार रजत यांना इंजिनच्या चाकातून धूर निघत असल्याचे व ठिणग्या पडत असल्याचे दिसले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी ताबडतोब गाडीला लाल सिग्नल दाखवला. यामुळे गाडी रावेर रेल्वेस्थानकापासून पुढे जात एक दीड किलोमीटरवर पूनखेडा पुलाजवळ थांबली.

त्या ठिकाणी इंजिनच्या चाकात आवश्यक ती दुरुस्ती करून गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली व पुढील अनर्थ टळला. या बाबतची माहिती मिळताच या प्रवासी गाडीतील प्रवासी इंजिनाजवळ गोळा झाले होते. या प्रवाशांनी रावेर स्टेशन मास्तरांना धन्यवाद दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT