Esakal
Esakal
जळगाव

Jalgaon Political News : बाजार समिती निकालांमुळे शिंदे गटात अस्वस्थता; आगामी निवडणूकांबाबत चिंता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शिवसेनेतून बाहेर पडून राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या नेतृत्वाखालील गटाला कृषी उत्पन्न बाजार समितीत अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे आगामी निवडणूकांत यश मिळविण्याच्या चितेंने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. (Shinde group is in doubt about upcoming elections winning due to loss in market committee jalgaon news)

जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. शिवसेना शिंदे गटाने भाजपसोबत युती करून या निवडणूका लढविल्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ज्या गटाच्या आमदारांचे वर्चस्व आहे, त्या ठिकाणी त्या पक्षाच्या आमदारांनी नेतृत्व केले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आमदार व माजी आमदारांनी नेतृत्व केलेल्या अमळनेर वगळता भुसावळ, जामनेर मतदार संघांत त्यांना चांगले यश मिळाले आहे. अमळनेरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनील पाटील यांच्यासमोर भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, बी. एस. पाटील व शिरीष चौधरी यांची लढत होती. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना यश मिळालेले नाही.

शिंदे गटाला अपेक्षीत यश नाही

शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे राज्यात भाजपासोबत सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांनी या निवडणूकीत यश मिळविण्यासाठी भाजपच्या संगतीने जोरदार प्रचार केला. परंतु, त्यांना अपेक्षीत यश मिळल्याचे दिसत नाही. पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेला पराभव जिव्हारी लागणारा आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सहकार क्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या आमदार पाटलांच्या पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या. त्यांच्या पुत्राचाही पराभव झाला आहे. पाचोरा बाजार समितीत आमदार किशोर पाटील यांचे वर्चस्व होते. मात्र, त्यालाही धक्का लागला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळून एकहाती सत्ता येण्याची अपेक्षा होती.

प्रत्यक्षात मात्र काठावर यश मिळाले. आता त्यांना सत्तेसाठी टेकूची अपेक्षा आहे. याठिकाणी भाजपने स्वतंत्र उमेदवारी करून दोन जागा मिळविल्या आहेत. एकत्र निवडणूक न लढवता भाजपने शिंदे गटाला आपला आगामी काळातील मनोदय दाखवून दिला आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक ही आमदाार पाटील यांना आगामी निवडणूकीसाठी मोठी सूचकता दाखवून गेली आहे.

मुक्ताईनगरात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना तर मोठा झटका बसला. त्यांना केवळ एकच जागा मिळाली. त्यामुळे आगामी काळात पाटील यांना निवडणूक लढविण्याबाबत यशासाठी मोठी चिंता आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही जळगाव बाजार समितीत सत्ता राखता आलेली नाही.

धरणगाव बाजार समितीतही त्यांना बारा जागा मिळाल्या असल्या, तरी ‘होम पीच’वर मात्र अपेक्षीत यश मिळालेले नाही. चोपड्यात शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या आहेत. मात्र त्यांना सत्ता मिळालेली नाही. सत्तेसाठी त्यांना दुसऱ्या गटाची साथ घ्यावी लागणार आहे.

आगामी रणनितीची चिंता

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे, अनिल पाटील, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, भाजपचे मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे व माजी खासदार (कै) हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखालील गटाला एकहाती सत्ता मिळाली आहे.

परंतु, शिवसेना शिंदे गटातील आमदारांनाच यश मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना फुटीचा फटका बसला कि भाजपने अपेक्षीत साथ न दिल्यामुळे झटका बसला, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी निवडणूकांमध्ये यशासाठी रणनिती बदलावी काय? या विचारामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे गटाचे सर्वच आमदार चिंतेत आहेत. त्यामुळे आगामी काळात ते काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT