CCTV DVR was taken away by the robbers and While inspecting the robbed bank, Superintendent of Police M. Rajkumar, Upper Superintendent Chandrakant Gawli  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अवघ्या 17 मिनिटांत बँक लूटून दरोडेखोर पसार; रक्तबंबाळ बँक मॅनेजरला तिजोरीत कोंडले..!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जुने जळगाव-नशिराबाद रोडवर कोल्हे विद्यालयाशेजारील स्टेट बँकेच्या शाखेत सकाळी साडेनऊला दरोडा पडल्‍याची घटना घडली.

काळे हेल्मेटधारी दरोडेखोरांनी चिली-स्प्रे, कोयता-चॉपरच्या जोरावर बँकेतील कॅशरुम तिजोरीतून ५ कोटींचे सोने व १७ लाखांची रोकड लूटून नेली. (State Bank branch robbed on 1 june jalgaon crime news)

बँक मॅनेजर राहुल महाजन यांच्या मांडीत चॉपर खुपसून जखमी अवस्थेतच त्यांना तिजोरीत कोंडून दरोडेखोर महाजन यांची दुचाकी घेत पसार झाले.

घटनास्थळ आणि जखमींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १) सकाळी ठिक सव्वा नऊच्या सुमारास स्टेट बँकेच्या कालिंका माता मंदिर चौक शाखेत सफाईवाला मनोज रमेश सूर्यवंशी, सुरक्षारक्षक संजय गोविंदा बोरनारे आले होते. ग्राहकांसाठी सकाळी दहाला बँकेचे कामकाज सुरु होत असल्याने तत्पूर्वी सफाई-हाऊसकिपींग स्टाफ येतो.

तर, मस्टर टाईम अगोदर १५ मिनिटांपूर्वी बँक मॅनेजर राहुल मधुकर महाजन (वय ३८) येतात. गुरूवारी (ता. ३१) नेहमीप्रमाणे कामाला सुरवात करतानाच बँक शाखेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. कोयता- चॉपरच्या जोरावर दोन हेल्मेटधारी दरोडेखोरांनी बँकेतून ५ कोटी रुपयांचे सोने आणि १७ लाख रुपयांची रोकड अवघ्या सतरा मिनिटांत लूटून नेली.

सतरा मिनिटांचा थरार.. सात जन्माची दहशत

नेहमीच्या वेळेवर आम्ही बँकेत पोहचलो. सफाईवाला मनोज, सुरक्षारक्षक त्यांच्या कामात व्यस्त होते. कॅशक्लार्क देवेंद्र नाईक, मी, नयन गिते कामाला सुरवात करण्यापूर्वी तयारी करत होते. इतक्यात दोन काळ्या रंगाचे हेल्मेटधारी बँकेत शिरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही बोलण्या आधीच त्यांनी धारदार शस्त्र बाहेर काढत डोळ्यावर स्प्रे मारुन व तोंडावर चिकटपट्या लावून वाशरुममध्ये बंदी बनविले. थोडावेळ डोळ्यात जळजळ होऊन अश्रूंसह दिसायला सुरवात झाली.

इतक्यात मॅनेजर राहुलसरांनी दार उघडून प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यावर स्प्रे मारुन त्यांना शस्त्र लावण्यात आले. मी, पोलिसांना फोन लावणार इतक्यात एकाची नजर गेली अन्‌ त्याने धारदार शस्त्राने हल्ला करुन बोट कापले. नंतर चाव्या, चाव्या असे ओरडत दोघांनी कॅश क्लार्कला बोलावित कॅशरुमकडे दोघांना घेऊन गेले. राहुलसर मदतीसाठी याचना करत असताना कानावर पडले.

दोघे दरोडखोर, मॅनेजर, क्लार्क यांचे फक्त पाय दिसत होते. परत, चावी-चावी असा आवाज झाला अन्‌ मॅनेजर राहुलसरांच्या ओरडण्याचा आवाज झाल्यावर काहीतरी बरेवाईट घडले या कल्पनेने आम्ही भेदरलो. थोड्या वेळात ते दोघे बॅगा भरुन बाहेर जाताना दिसले. तोंडावरील चिकटपट्ट्या टेप काढून बघितले, तर राहुलसर जखमी असल्याचे कळाले. तत्काळ १०० नंबरवर फेान डायल केला.

पूर्वनियोजित दरोडा

केवळ दोनच दरोडेखोर, दोघांच्या अंगात काळे कपडे, डोक्यावर काळे हेल्मेट होते. त्यापैकी एक धिप्पाड शरीरयष्टीचा होता. बँक सुरु होण्यापूर्वीची संपूर्ण माहिती दोघा दरोडेखोरांनी घेतली हेाती. तसेच, बँकेत वारंवार येऊन सिसीटीव्हीसह बँकेच्या आतील व्यवस्थेची माहिती त्यांनी घेतली असावी.

अगदी नियोजनबद्धरित्या दरोडा टाकून, लूट करुन बँकेतील सिसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, कर्मचाऱ्यांचे ४ मोबाईल, बँक मॅनेजरची दुचाकी घेवून जाणे, दरोडेखोरांनी साधलेली वेळ, केवळ चॉपर-कोयत्याच्या जोरावर बँक लूटीसाठी पूर्वनियोजित अभ्यास केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

बँक मॅनेजरला कोंडले..

५ कोटींचे सोने, १७ लाखांची कॅश हाती लागल्यावर मॅनेजर राहुल महाजन यांच्या दुचाकीची चावी दोघांनी मागीतली. चावी देत नाही म्हणुन त्यांच्या मांडीत खोलवर चॉपर खुपसून जखमी केल्यावर त्यांना कॅशरुममध्ये विरुद्ध बाजूला तोंड करायला लावत रक्तबंबाळ अवस्थेत कॅशरुममध्येच कोंडून देाघे दरोडेखोर महाजन यांची अपाची दुचाकी (एमएच १९, बीई २७७८) घेवुन पसार झाले.

घटनाक्रम..

९:१५ - हाऊसकिपींग स्टाफ दाखल

९:२० - साफसफाईला सुरवात

९:२० - कॅशक्लर्क, कर्मचारी दाखल

९:३५ - दोन हेल्मेटधारी बँकेत आले

९:४० - तिघांच्या डोळ्यात स्प्रे मारुन केले ओलीस

९:४५ - मॅनेजर राहुल महाजन पोहचले, तेव्हा आतुन दार बंद

९:४६ - दरोडेखोरांने दार उघडून महाजन यांच्यावर स्प्रे मारला

९:४८ - कॅशक्लार्क देवेंद्र नाईक, मॅनेजर राहुल महाजन चॉपरच्या टोकावर ओलीस

९:५० - दोघांना घेऊन दरोडेखोर कॅशरुम मध्ये दाखल

९:५५ - चाव्या मागुन तिजोरी उघडली

१०:०० - ५ कोटींचे सोने, १५ लाख बॅगमध्ये टाकले

१०:०५ - महाजन यांच्या दुचाकीची चावी घेतली

१०:१० - दुचाकीने दोघे दरोडेखोर बॅग घेत पसार.

- अनडिटेक्ट बॅंक दरोडे

- वर्ष २००९ : नूतन मराठा महाविद्यालयासमोरील आयसीआयीआय बॅंक फोडली

- वर्ष २०१९ : निंभोरा बॅंक मॅनेजरला गोळी घालत दोन हेल्मेटधारींचा दरोडा

अयोध्यानगरच्या नाल्यात सापडल्या वस्तू

या दरोड्यात दरोडेखोरांनी नष्ट केलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर, बँक कर्मचाऱ्यांचे व अन्य असे ५ मोबाईल, १ हेल्मेट अशा वस्तू सायंकाळी पाचला आयोध्यानगरच्या नाल्यात आढळून आल्या. पोलिस पथकाने या वस्तू दरोड्याच्याच घटनेतील आहे की नाही, याबाबत खात्री करुन घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT