Status of Municipal Schools esakal
जळगाव

Jalgaon : महापालिका शाळांची स्थिती; विद्यार्थी वाढेनात,शिक्षक झाले अतिरिक्त

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका शाळा म्हणजे एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर मानले जात होते. जळगाव शहरातही महापालिका शाळांचे एक वेगळेच वैभव होते. मात्र आज ते पूर्ण लयास गेले आहे. आज महापालिका शाळेत विद्यार्थिसंख्या वाढत नाही, त्यासाठी प्रयत्नही होत नाहीत.

त्यामुळे शाळांची संख्या घटली आहे, दुसरीकडे शिक्षकही अतिरिक्त झाले आहेत. त्यांच्या पगाराचा भार महापालिकेवर पडत आहे. समायोजनेबाबत शिक्षण विभागही अहवाल देण्याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.(Status of Municipal Schools Students did not increase teacher become additional Jalgaon News)

जळगाव महापालिकेच्या शाळांमध्ये एकेकाळी अत्यंत दर्जेदार शिक्षण दिले जात होते. मात्र कालांतराने खासगी प्राथमिक शाळांकडे पालकांचा कल अधिक वाढला. मोफत शिक्षण तसेच सवलती असूनही पालक महापालिका शाळेत आपल्या पाल्यांना टाकण्यास तयार नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस महापालिका शाळांची संख्या घटत आहे.

जळगाव महापालिकेच्या शहरात तब्बल ५१ शाळा होत्या. त्या मराठी, ऊर्दू आणि हिंदी माध्यमाच्या होत्या. मात्र गेल्या दहा वर्षांत शाळांची संख्या घटली आहे. आजच्या स्थितीत महापालिकेच्या केवळ २३ प्राथमिक शाळा आहेत. त्यात मराठी माध्यमांच्या १२, ऊर्दू १०, तर हिंदी माध्यमाची केवळ एक शाळा आहे. या शाळांमध्ये साधारणत: चार हजार विद्यार्थिसंख्या आहे. शहरातील लोकसंख्येच्या मानाने महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे.

अतिरिक्त शिक्षकांचा बोजा

महापालिकेच्या २३ शाळांमध्ये साडेचार हजार विद्यार्थी आहेत. आजच्या घडीला तब्बल १७५ शिक्षक कार्यरत आहेत. ३० शिक्षकांमागे एक विद्यार्थी असा शासनाचा रेशो आहे. त्यानुसारच शिक्षकांची नियुक्ती केली जाते आणि त्यानुसारच शाळांना संच मान्यता दिली जाते. महापालिका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थिसंख्या याचा शासनाच्या नियमाप्रमाणे रेशो पाहिल्यास केवळ दीडशे शिक्षकांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे तब्बल २५ शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याचा तब्बल १५ लाख रुपयांचा बोजा दरमहा महापालिकेला सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शासनाने महापालिकेकडे त्याबाबत अहवाल मागितला आहे; परंतु शिक्षण विभाग हा अहवाल देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होण्यासही अडचण निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिक्षण मंडळच अस्तित्वात नाही

महापालिकेत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळ नियुक्त असते. त्यात शिक्षण मंडळ अध्यक्ष, सदस्य असतात. त्यांच्या माध्यमातून काम सुरू असते, त्यातून महापालिका शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवून विद्यार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत शिक्षण मंडळ अस्तित्वात नाही. माजी नगरसेवक विजयकुमार रामदास वाणी यांच्यानंतर शिक्षण मंडळ अध्यक्षच नियुक्त झालेला नाही. पुढे शिक्षण मंडळच अस्तित्वात आले नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळेतील शिक्षणाकडे लक्षच देण्यात आले नाही. परिणामी पालिका शाळांकडे विद्यार्थीच वळले नाहीत. शाळांची संख्याही घटत गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT