Crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पेट्रोलपंप दरोड्यातील संशयिताना अटक; संशयिताच्या बुटावरून लागला छडा

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : पिस्तूल दाखवून डांगर शिवारतील पेट्रोलपंपासह तिघांना लुटणाऱ्या संशयिताच्या बुटावरून शोध लावून त्याच्या साथीदारासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Suspects arrested in petrol pump robbery case solved by suspects shoe Jalgaon Crime News)

डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर शुक्रवारी (ता. २४) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास तोंडाला काळा रुमाल बांधून एकाने पिस्तूल दाखवत पंपावरील कर्मचाऱ्यांना उठवून किशोर रवींद्र पाटील यांच्याकडून १४ हजार ३००, नरेंद्र सोनसिंग पवार यांच्याकडून १३ हजार २०० रुपये आणि त्याचवेळी डिझेल भरायला आलेल्या संजय दिलीप भामरे यांच्या गाडीला धडक देऊन त्यांच्याकडून ९ हजार रुपये लुटून त्याच्या दुसऱ्या साथीदारासोबत मोटरसायकलने धुळ्याकडे फरार झाला होता.

पिस्तूलधारक आरोपी पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आला होता. आरोपी नवखा असल्याने त्याची ओळख पटणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी पंपावरचे फुटेज निरखून पाहिले असता त्यांना आरोपीचे बूट पांढऱ्या रंगाचे आणि वेगळे असल्याचे जाणवले.

त्यांनी शोध (डीबी) पथकातील रवी पाटील आणि दीपक माळी यांना विविध बिअरबार आणि दारूचे दुकाने तपासण्याचे आदेश दिले. दोन्ही पोलिसांनी तपासण्या केल्या असता वर्णनाचे दहा तरुण पोलिसांच्या डोळ्यासमोर आल्यानंतरही संशयिताची ओळख पटत नव्हती.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

अखेर बुटांवरून हा संशयित बिअरबारमध्ये येऊन गेला व तो गलवाडे रस्त्याकडे गेला असून, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बुटांवरून खात्री होताच त्याला पोलिसी झटका दाखवला.

तो रईस शेख उस्मान (वय ४०, रा. आळंद, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) असून, तो आपल्या बहिणीकडे बंगाली फाईलमध्ये वेगळी खोली करून राहत होता. गल्लीत वर्दीवर वाहनचालक असल्याचे त्याने सांगितले.

त्याला त्याच्याच गावाचा साथीदार आरिफ अहमद शेख (वय ३५, रा. आळंद, ता. फुलंब्री) याने मोटरसायकलवर पंपापासून पळून गेले होते. पोलिसांनी त्यालाही हुडकून काढून अटक केली. पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे व पोलिस कर्मचारी योगेश महाजन यांनी संशयिताना न्यायालयात हजर केले असता न्या. स्वाती जोंधळे यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT