jalgaon corona update
jalgaon corona update sakal
जळगाव

जळगाव : तिसऱ्या लाटेतील बाधितांमध्ये लक्षणे सौम्य

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मार्च २०२०पासून कोरोनाने भारतात धुमाकूळ घालत जनजीवन प्रभावित करून टाकलेय. या दोन वर्षांत आधीच्या टप्प्यातील संसर्गाच्या दोन लाटांसह आता तिसरी लाट अधिक वेगाने संक्रमण करतेय.. मात्र, या तिघा लाटांच्या तुलनात्मक अभ्यासात तिसऱ्या लाटेतील संसर्ग वेगाने होत असला तरी त्यातील लक्षे मात्र अगदीच सौम्य असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. गेल्यावर्षी जानेवारीपासून भारतात कोविड प्रतिबंधक लसीकरण(covid vaccination) अभियान सुरू झाले. वर्षभरात १४० कोटींपेक्षा अधिक डोस देण्यात आलेत. शिवाय, कोरोना बाधितांची संख्याही कोटींच्या घरात आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेची तीव्रता संपल्यानंतर संसर्गाची तिसरी लाट काही येणार नाही, असा समज होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन(omicron varient) या नव्या व्हेरिएंटने तो फोल ठरविला व भारतात तिसरी लाट धडकलीच.

दोन लाटांचा विदारक अनुभव

भारतात मार्च २०२०पासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. पहिल्या लाटेची तीव्रता जुलै २०२०पर्यंत होती. या काळात ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी (को-मॉर्बिड) असलेल्या रुग्णांना जास्त त्रास झाला, किंबहुना या वर्गातील रुग्णांची जीवितहानी अधिक झाली. दुसरी लाट फेब्रुवारी ते मे २०२१ अशा तीन महिन्यांत तीव्र झाली. डेल्टा व्हेरिएंटने या लाटे अक्षरशः हाहाकार उडविला. ज्येष्ठांसह तरुणांनाही या व्हेरिएंटने ग्रासले व अनेक तरुणांनी जीव गमावला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील संसर्ग दर जवळपास दुप्पट होता.

तिसऱ्या लाटेत संसर्ग दर अधिक

दुसरी लाट जून २०२१पासून ओसरू लागली व डिसेंबरपर्यंत पूर्णपणे निष्प्रभ झाली असतानाच ओमिकॉनचा या नव्या कोरोना व्हेरिएंटचा शिरकाव झाला आणि पुन्हा एकदा देश टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत ओमिक्रॉनचा संसर्गदर सहापट असल्याचा दावा केला जात आहे.

लक्षणे मात्र सौम्य

असे असले तरी या तीनही लाटांमधील बाधितांमधील लक्षणे बघता तिसऱ्या लाटेतील संसर्गदर अधिक असूनही त्यातील लक्षणे मात्र सौम्य आहेत. आणि त्यामुळेच बाधित रुग्ण गंभीर होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. विशेष म्हणजे या तीनही लाटांमध्ये कोरोना बाधितांच्या लक्षणांमध्येही बऱ्यापैकी बदल झाले आहेत.

रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी

या लाटेतील लक्षणे व रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरुनही लक्षात येते. गुरुवारपर्यंत जळगाव जिल्ह्यात १३६ सक्रिय रुग्ण होते, पैकी केवळ १४ रुग्णांमध्ये लक्षणे होती, तर उर्वरित १२२ रुग्ण लक्षणे नसलेली आहेत. विशेष म्हणजे यापैकी अवघा एकच रुग्ण ऑक्सिजनवर असून एकही रुग्ण आयसीयूत नाही.

या लाटेची आताच सुरवात झालेली आहे. त्यामुळे रुग्ण गंभीर होतात की, त्याचे परिणाम आठवडाभरानंतर दिसतील. काही तज्ज्ञांनी या लाटेत आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. मात्र, या टप्प्यात संसर्गदर खूप जास्त असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.

- डॉ. एन.एस. चव्हाण

जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT