A review meeting of officials regarding the drought situation and measures in Chalisgaon taluka was concluded esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : पाणीटंचाई निवारणार्थ यंत्रणा सज्ज; सद्यःस्थितीत 11 गावांमध्ये टॅंकर सुरु

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Scarcity : तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर येथील तहसील कार्यालयात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांकडून टंचाई निवारणार्थ माहिती घेऊन विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार प्रशांत पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

सुरुवातीला तहसीलदार पाटील यांनी तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुखांशी दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना व नियोजन करण्यासंदर्भात चर्चा केली. तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून पाऊसच नसल्याने ती वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले. (System ready for water shortage relief chalisgaon jalgaon news)

तालुक्यातील खडकीसीम व कृष्णापुरी हे दोन मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित बारा प्रकल्प कोरडेठाक आहेत. सरासरी ४५ टक्केच पर्जन्यमान झाल्याने पिकांचीही परिस्थिती नाजूक असून रब्बीला फटका बसण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या बैठकीत पीक विमा, गिरणा धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन, वीज भारनियमन आदी विषयांवर चर्चा झाली. कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी पीकविमा संदर्भात माहिती देताना तालुक्यातील सात मंडळांमध्ये झालेल्या पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त झालेला खंड व प्रमाण पाहता उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता वर्तवली.

तालुक्यात एकूण ५७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला असून या संदर्भात ग्रामविकास अधिकारी व कृषी सहायकांमार्फत सर्व्हेक्षण करण्याचे ठरले. प्रती पीक १० सर्व्हेक्षण करुन त्यानुसार शेतकऱ्यांना २५ टक्के विमा संरक्षण देण्याबाबत शिफारस करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

शहरात चार दिवसाआड पाणी

पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात माहिती देताना सद्यःस्थितीत चारदिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. गिरणा धरणात सद्यःस्थितीत ३६ टक्के पाणीसाठा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरात पाण्याची टंचाई जाणवल्यास आवश्यक त्या उपाययोजना करुन योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रस्ताव पाठविणार

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातर्फे रहिपुरी येथील नगरपालिकेची विहीर स्वचछ करुन त्यातील गाळ काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यात नवीन ईलेक्ट्रीक मोटर कनेक्शन व पाईपलाईन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे या बैठकीत ठरले.

१७ गावांमध्ये जलजीवन मिशनच्या सुरु असलेल्या योजनांसंबधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्याचे तसेच एका ठिकाणी पाणी घेऊन टँकर भरण्यासाठी सोय होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घेण्याचे ठरविण्यात आले.

ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करुन योग्य नियोजन सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सात दिवसांनी पुन्हा उपविभागीय अधिकारी प्रशांत हिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे ठरले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT