Death News esakal
जळगाव

Jalgaon Accident News : चालत्या रेल्वेतून उतरताना चाळीसगावला शिक्षकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalagaon News : आई-वडिल हरिद्वार येथे यात्रेसाठी जात असल्याने त्यांना रेल्वे स्थानकावर पोहचवून रेल्वेमध्ये बसवून त्याच रेल्वेच्या डब्यातून उतरताना गाडीचा वेग वाढल्याने नियंत्रण सुटून रेल्वेखाली आल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी (ता. २५) पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. (teacher died in Chalisgaon while getting off moving train jalgaon accident news)

मूळचे माळशेवगे (ता. चाळीसगाव) रहिवासी असलेले योगेश गंभीरराव सूर्यवंशी (वय ४१) चिंचगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. ते आपल्या आईवडील व कुटुंबासह चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विवेकानंद कॉलनी, बाप्पा पॉंईट परिसरात वास्तव्यास आहेत.

त्यांचे आई-वडील हरीद्वार येथे यात्रेसाठी जात असल्याने गुरुवारी (ता. २५) पहाटे पाचच्या सुमारास त्यांना सोडण्यासाठी योगेश सूर्यवंशी हे रेल्वे स्थानकावर आले होते. आई वडिलांना पहाटेच्या दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये त्यांनी बसवले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, त्याचवेळी गाडी सुरू झाल्याने योगेश पाटील हे घाईत रेल्वेतून उतरताना गाडीकडे ओढल्या गेल्याने रेल्वेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना प्लॅटफार्मवरील इतर प्रवाशांचा लक्षात येताच, त्यांनी धाव घेतली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही.

रेल्वे पोलिसांनी त्यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेला. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार जंजाळकर तपास करीत आहेत. योगेश सूर्यवंशी हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धर्मा वाघ यांचे जावई होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: कोणालाही अपेक्षा नव्हती! पदभार घेताच CJI सूर्यकांतांचा निर्णय देश चकित करणारा, सर्वात मोठी समस्या संपणार?

Nagpur News : 'दैनिक नवप्रभात'च्या संपादकांच्या घराला लक्ष्य; अवैध धंद्याला विरोध केल्याने दगडफेक, काचा फुटल्या...

सचिन पिळगावकर की अशोक सराफ! कोण जास्त श्रीमंत? संपत्तीत कोण आहे पुढे?

Farmer Success Story: 'धुमाळवाडीच्या द्राक्षांना आखाती देशात भाव'; फळबाग लागवडीत वृद्ध शेतकऱ्याची किमया, वर्षाकाठी ५० लाखांची कमाई !

Satara News: 'मद्यधुंद युवतीचा धिंगाणा': कऱ्हाड- चिपळूण रस्त्यावरील घटना; वाहनांच्या रांगा, नशा चडली अन्..

SCROLL FOR NEXT