जळगाव

Jalgaon News : तहसीलदारांच्या मदतीने वृद्ध भारावले; संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाचा मिळवून दिला लाभ

दीपक कच्छवा

Jalgaon News : ‘पोरा आमचा पगार चालू कर रे, कधीपासून चकरा मारतोय... अजून काम होईना झालंय...’ असे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील बाकावर बसलेल्या खेड्यांतील दोन ज्येष्ठ नागरिकांनी एका सुटाबुटातील व्यक्तीला सांगितले.

त्यावर ‘थांबा, थोडा वेळ मी काही तरी करतो’ असे त्या सुटाबुटातील व्यक्तीने त्यांना सांगितले आणि थोड्याच वेळात या दोन्ही ज्येष्ठांचे जे काम होते ते करून दिले. आपले काम करणारा व्यक्ती स्वतः तहसीलदार आहेत, हे त्या दोन्ही ज्येष्ठांना समजल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी तहसीलदारांचे आभार मानले. (tehsildar help old man to get benefit of Sanjay Gandhi Niradhar Yojana subsidy jalgaon news)

चाळीसगाव तहसीलदार कार्यालयात दररोज विविध कामांसाठी खेड्यापाड्यावरून अनेक जण येत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित असलेले दोघे वृद्ध आज सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच्या ओट्यावर बसले होते. तहसीलदार प्रशांत पाटील हे कार्यालयाकडे येत असताना त्यांचे लक्ष दोन्ही वृद्धांकडे गेले. दोघे बाकावर बसून केळी खात होते. त्यांच्याजवळील पिशवीत केळी व काही कागदपत्रे होती.

तहसीलदार पाटील यांनी आपली ओळख न देता, ‘तहसीलमध्ये काही काम आहे का?’ असे त्यांना विचारले. ‘काही नाही भाऊ, पगाराचं काम होतं’ असे एकाने सांगितले. तहसीलदार पाटील यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे पाहिल्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे दोन महिन्यांपासून त्यांचे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेले नसल्याचे लक्षात आले.

क्षणाचाही विलंब न करता संजय गांधी निराधार योजना विभागातील कर्मचारी संजय पाटील यांना बोलावून सर्व आवश्‍यक ती पूर्तता केली. हे सर्व झाल्यानंतर पाच दिवसात बँकेत अनुदानाची रक्कम जमा होईल असे, त्यांना सांगितले. ज्याने हे काम केले ते स्वतः तहसीलदार आहेत, हे त्या दोन्ही ज्येष्ठांना समजल्यानंतर त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी नमस्कार करून त्यांचे आभार मानले.

‘फेसबुक’वरील पोस्टला प्रचंड ‘लाईक’

तहसीलदार पाटील यांनी घडलेल्या या प्रसंगाचे सविस्तर वर्णन असलेली पोस्ट त्यांच्या ‘फेसबुक’वर टाकली. ज्यात त्यांनी ‘माझ्या दिवसाची सुरवात चांगली झाल्याने माझे मन देखील प्रसन्न झाले.

आजकाल अभावानेच दृष्टीस पडणारा असा सुंदर प्रसंग मी संग्रही न ठेवला तरच नवल, मी लगेच मोबाईलचा कॅमेरा ऑन करून त्यात ग्रामीण भागातून आलेल्या या मित्रांच्या जीवनातला हा सहजसुंदर प्रसंग तर टिपलाच, माझ्या आठवणीसाठी पुन्हा बाहेर जाऊन त्यांच्यासह फोटो काढण्याचा मोह देखील मला आवरता आला नाही.

वरवर पाहता हा प्रसंग तसा एकदम साधारण. मात्र, त्यामुळे मला माझ्यासमोर आजवर आलेली अनेक निराधार योजनांची प्रकरणे आठवली’ अशा आशयाची सुंदर पोस्ट टाकली. त्याला प्रचंड लाइक मिळाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT