MIDC police with stolen bike and thief.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जळगावची दुचाकी विकतो धुळ्यात तर नंदुरबारची जळगावला; चोरट्याला अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातून चोरलेली दुचाकी धुळ्यात, नंदुरबार येथून चोरलेली जळगावात विक्री करून अनेक वर्षांपासून गुंगारा देणारा अट्टल गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांच्या हाती लागला आहे.

जळगाव शहरात चोरीची दुचाकी विक्री करताना भामट्याला अटक केली. त्याने ११ दुचाकी काढून दिल्या. गोपाळ भाईदास शिरसाठ (वय २३, मूळ रा. पिळोदा, ता. शिरपूर जि. धुळे, ह.मु. बेस्तान, जि. सुरत) असे चोरट्याचे नाव आहे. (thief arrested while selling stolen bike in Jalgaon city crime news)

दुचाकी चोरटा गोपाळ भाईदास शिरसाठ मास्टर चावीने दुचाकींची चोरी करुन त्याची विक्री दुसऱ्या जिल्‍ह्यात करीत होता. गोपाळ शिरसाठ अजिंठा चौफुली परिसरात दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून पोलिसांनी गोपाळ शिरसाठ याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने आपण जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या ११ विनाक्रमांकाच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गोपाळ याने एमआयडीसी हद्दीतून २, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १, अमळनेर येथून २, शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३, देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १, दोंडाईचा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १, नंदुरबार पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १, अशा दहा दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध याठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, विकास सातदिवे, किशोर पाटील, स्वप्नील पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, ईश्र्वर भालेराव, इम्तियाज खान यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT