school time change esakal
जळगाव

Jalgaon News : सर्व शाळांची 1 एप्रिलपासून वेळ बदलणार : जिल्हाधिकारी मित्तल; जाणून घ्या नवीन वेळ

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांची (School) वेळ १ एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी एक अशी राहणार आहे. (timing of government and private primary and secondary schools will be from 7 am to 1 pm from April 1 jalgaon news)

तसे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी (ता. २७) काढले आहेत. उष्माघात उपाययोजनांतर्गत शाळांच्या वेळेत हा बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना दिल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा उष्माघात प्रवण असल्याने व ही बाब आपत्ती या सदरात येत असल्याने यापूर्वीच विविध उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

त्यात आता शाळांच्या वेळेतही बदल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांच्या वेळेत १ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ असा बदल करण्यात आला आहे, तसेच उष्माघाताची तीव्रता लक्षात घेऊन संबंधितांनी तत्काळ कार्यवाही करावी, हे सर्व शाळांना बंधनकारक आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT