Chowgaon fort situated on the banks of Satpuda.  esakal
जळगाव

Chaugaon Fort : निसर्ग, दुर्गप्रेमींसाठी एक पर्वणी! चौगाव किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी

रोहिदास मोरे

Jalgaon News : जिल्ह्यातील दुर्ग प्रकारापैकी एकमेव सुस्थितीत असणारा सातपुड्यातील चौगावचा किल्ला म्हणजे निसर्ग सौंदर्याचा ठेवाच म्हणावा लागेल.

चोपड्यापासून अवघ्या बारा किलोमीटरवर व चौगावपासून तीन कि.मी.वरील चौगावचा किल्ला हा निसर्ग व दुर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरत आहे. (tourists visiting Chaugaon Fort jalgaon news)

सातपुड्याच्या पहिल्याच रांगेत व निसर्गाच्या सान्निध्यात हिरवाईने नटलेल्या डोंगरात वसलेला हा किल्ला सध्या पर्यटकांचे मन वेधून घेत आहे. चौगावपासूनच जंगलातून जाणारा रस्ता, दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडे, झुरझुळ वाहणारे नाले, विविध आवाज काढून पर्यटकांचे स्वागत करणारे पक्षी, मध्येच कुठेतरी क्वचितच हरीण, नीलगाई, तडस, मोर यांचे दर्शन यामुळे मन अगदी भारावून जाते.

गावापासून तीन कि.मी.वर असणारा नीन नाल्यांचा संगम म्हणजे त्रिवेणी संगम तेथेच असणारे पुरातन महादेव मंदिर व पर्यटकांना बसण्यासाठी असलेले पत्री शेड व सिमेंट आसन व हातपंपावर पिण्यासाठी शुद्ध पाणी आहे. पोहण्यासाठी बांध आहेत. त्रिवेणी संगमाच्या अलिकडेच वाहन लावून पुढचा किल्ला व धबधब्यापर्यंत वळून मार्गाने करावा लागणारा पायी प्रवास.

किल्ल्यावर चढल्यावर तेथून दिसणारा सातपुडा परिसर म्हणजे जणू स्वर्गच. किल्ल्यावर असणाऱ्या शालिवाहन कालिन लेण्या ज्यांना स्थानिक लोक टाक्या म्हणतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आजही सुस्थितीत उभे असलेले दरवाजे, सप्ततलावांचा समूह, राजप्रसादालय, बुरूज, भुयारी मार्ग हे बाराव्या शतकातील साक्ष देतात.

तसेच किल्ल्याच्या बाजूलाच असलेला उंच धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. धबधबा हा घनदाट झाडांच्या मध्ये आहे. तिथे गेल्यावर पर्यटकांना आंघोळीचा मोह आवरला जात नाही. पण पाऊस चालू असल्यास धबधब्याखाली आंघोळीला कुणी जाऊ नये, अशा ह्या निसर्गमय वातावरणात दररोज शेकडो पर्यटकांची वर्दळ असते.

पण दुर्दैव ह्या किल्ल्याची पुरातन विभागाला अजूनही नोंद नाही, त्रिवेणी मंदिरापर्यंत चारचाकी व दोन चाकी वाहन जात असली तरी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता,अल्पोपहाराची सोय, पर्यटकांसाठी निवारा किंवा विश्रामगृह व लाइट अत्यावश्यक सेवा नसल्याने येथे मुक्कामी राहाता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT