new district collector of jslgson Ayush Prasad and transfer of aman mittal  esakal
जळगाव

Jalgaon District Collector : जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंची बदली; यांची नियुक्ती..

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon District Collector : जिल्हाधिकारीपदी सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या अमन मित्तल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पुणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती शासनाने केली आहे. (Transfer of Jalgaon Collector Zilla Parishad CEO jalgaon news)

महाराष्ट्र शासनाने शुक्रवारी (ता.२०) राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले.

त्यात जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांचीही यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी नवे सीईओ गडचिरोलीतील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित पन्नू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मित्तल यांना भोवल्या वाळूसंबंधी तक्रारी

अमन मित्तल हे जळगाव जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वीच अभिजित राऊत यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. परंतु, अल्पावधीत त्यांची बदली करण्यात आली. जळगावी रुजू झाल्यापासूनच मित्तल यांच्याबद्दल शासन स्तरावर तक्रारी करण्यात आल्या.

अवैध वाळू वाहतूक व प्रशासनातील अनियंत्रित कारभाराच्या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी झाल्या. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही या तक्रारींची दखल घेऊन सादर केलेल्या अहवालात ताशेरे ओढल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच मित्तल यांची बदली झाल्याचा दावा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT