police (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : पोलिस दलातील 15 प्रभारींच्या बदल्या; बाहेरील जिल्ह्यातील अधिकारी हजर

जिल्‍ हापोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी नुकत्याच १५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : विविध जिल्ह्यांत कार्यकाळ पूर्ण झालेले, बरीच वर्षे एकाच रिजनमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असून, जिल्‍ हापोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी नुकत्याच १५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले.

जळगाव जिल्हा पोलिस दलात अहमदनगर येथून आलेले निरीक्षक मधुकर साळवे यांची प्रभारी चोपडा शहर, तर नाशिक ग्रामीण येथून आलेले निरीक्षक विकास देवरे यांची अमळनेर प्रभारी म्हणून, तर अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांची नियंत्रण कक्ष, जळगाव येथे बदली झाली. (Transfers of 15 officers in police force jalgaon news)

निरीक्षक सुनील पाटील भडगाव पोलिस ठाणे, निरीक्षक संदीप रणदिवे रामानंदनगर पोलिस ठाणे, भुसावळ बाजारपेठचे निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी प्रभारी पोलिस ठाणे.

भुसावळ शहर पोलिस ठाण्यातून सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांना अडावद पोलिस ठाणे प्रभारी म्हणून, तर स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक नीलेश राजपूत यांची कासोदा पोलिस ठाणे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली.

नाशिक ग्रामीण येथून बदलीवर आलेले सहाय्यक निरीक्षक प्रकाश काळे यांची पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात आणि तेथील सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली झाली.

धुळे येथून सहाय्यक निरीक्षक गणेश फड, अहमदनगर येथील सहाय्यक निरीक्षक तेजश्री पाचपुते यांची नियंत्रण कक्षात, नाशिक ग्रामीण येथील कल्याणी वर्मा यांची जळगाव शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली.

नाशिक ग्रामीण येथून आलेले उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांची निंभोरा पोलिस ठाण्यात नियुक्तीचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT